💥पुर्णा पंचायत समिती शिक्षण विभागालील वरिष्ठ सहाय्यक लिपिक ए.एस.महाजन यांना पदोन्नती...!


💥श्री.महाजन यांची पालम पंचायत समिती मध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती💥


 
पुर्णा (दि.२१ नोव्हेंबर) - पुर्णा पंचायत समिती शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक श्री.अरूण एस.महाजन यांना जेष्ठतेनुसार पदोन्नती बहाल करण्यात आली असून त्यांना पालम पंचायत समिती मध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती बहाल करण्यात येत असल्याचे लेखी आदेश परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांदेकर यांनी दिले आहेत.

पुर्णा पंचायत समितीतील शिक्षण विभागात कार्यरत वरिष्ठ सहाय्यक लिपिक अरूण महाजन यांनी आपल्या कर्तृत्वाने अत्यंत कर्तव्यदक्ष व मनमिळावू अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली होती त्यांना बहाल करण्यात आलेल्या पदोन्नती बद्दल आज सोमवार दि.२१ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारच्या सुमारास पंचायत समितीत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंचायत समितीच्या बिडीओ श्रीमती वानखेडे मेडम,विस्तार अधिकारी के.के.पवार(सांकीकी),विस्तार अधिकारी सुरेवाड,श्री.कनकुटे,श्री.पटेल,श्री.नबीन यांच्यासह सर्व मान्यवर कर्मचारी उपस्थित होते तर गट शिक्षण अधिकारी कार्यालय गटसाधन केंद्र पंचायत समितीत देखील गट शिक्षण अधिकारी श्री कापसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री अरूण महाजन यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गट शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी देखील उपस्थित होते यानंतर जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स वेब वृत्तवाहिनी कार्यालयात देखील कर्तव्यदक्ष अधिकारी श्री.महाजन यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संपादक/संचालक चौधरी दिनेश,सामाजिक कार्यकर्ते तथा गौर येथील प्रतिष्ठित नागरिक श्री.विजय जोगदंड पाटील,कोंडीबा भंगे यांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला....... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या