💥जागतिक वारसा सप्ताहा निमित्ताने वझुर या गावासाठी हेरिटेज वॉकचे यशस्वी आयोजन....!


💥जगभर युनेस्को दि.19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर हा आठवडा 'जागतिक वारसा सप्ताह' म्हणून साजरा करते💥

[सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय , महाराष्ट्र राज्य व वझुर ग्रामस्थ, ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन]


पूर्णा : तालुक्यातील वझुर येथे दि 20 नोव्हेंबर 2022 रोजी श्री रामेश्वर महादेव प्राचिन मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १९ ते २५ नोव्हेंबर हा आठवडा संपूर्ण जगभर युनेस्को “जागतिक वारसा सप्ताह” म्हणून साजरा करते. याचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व लोकांना विशेषतः तरुणांना आपल्या देशातील सर्व प्राचीन वारसा बद्दल जनजागृती करणे तसेच या सर्व वारसास्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करणे होय. भारतातही या सप्ताहात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वारसास्थळां बद्दल जनजागृती अभियान व इतर कार्यक्रम घेतले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून वझुर येथे श्री रामेश्वर महादेव प्राचिन मंदिर येथे हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते .

         सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी श्री लक्ष्मण पवार, अध्यक्ष देवस्थान वझुर, मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ.आत्माराम शिंदे सर इतिहास वारसा अभ्यासगट तथा मूर्तिशास्त्र तज्ञ मा.इतिहास विभागप्रमुख ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी.प्रा. डॉ. गणपत पिसे सर ज्ञानोपासक महाविद्यालय इतिहास  विभागप्रमुख

उपस्थित लाभली होती. प्रमुख पाहुणे म्हणून श्री नीलकंठ काळदाते ऐतिहासिक वारसा अभ्यासगट सदस्य तथा मूर्तीशास्त्र अभ्यासक , श्री वैजनाथ काळदाते ऐतिहासिक वारसा अभ्यासगट सदस्य तथा मूर्तीशास्त्र अभ्यासक होते. तर कार्यक्रमास उपस्थित श्री लक्ष्मण लांडे सरपंच वझुर,तसेच  श्री मोतीरामजी पवार उपाध्यक्ष देवस्थान वझुर, विश्वास्त विठ्ठल डिगोळे , श्री राजेभाऊ पवार,  श्री रामराव पवार, आदींची उपस्थित होती.

डॉ शिंदे मार्गदर्शक म्हणून समस्त गावकऱ्यांना प्रत्येक मूर्तीची ओळख करून देत शास्त्रीय पध्दतीने माहिती दिली. तसेच वझुर येथिल रामेश्वर मंदिरातील सुंदर आशा शिलालेखाविषयी माहिती दिली. लेखाचे वाचन केले. स्थापत्य कला , चित्रकला, मूर्तीओळख, विषयी सरांनी गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांना सांगितली तसेच प्रा.डॉ.गणपत पिसे मार्गदर्शक म्हणून बोलतांना जागतिक वारसा सप्ताह का साजरा केला जातो. वझुर गावचे स्थानमहात्म्य, सांस्कृतिक वारसा, धार्मिक वारसा, परंपरा, कला याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रगती कोचिंग क्लासेस वझुर , जिल्हा परिषद शाळा वझुर व जय किसान विद्यालय लिमला शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

       कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन प्रल्हाद पवार ऐतिहासिक वारसा अभ्यासगट सदस्य यांनी केले व आभार प्रदर्शन दिलीप पवार यांनी केले यशस्वी कार्यक्रम होण्यासाठी श्री शिवाजी पवार , अंगद पवार, बाळू महाराज, नामदेव पवार , कपिल पवार आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या