💥मान्यताप्राप्त संस्था-कंपनीमार्फत शिपाई पद भरण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन....!


💥असे आवाहन सहायक संचालक नगर रचना शि.व्यं.जाधव यांनी केले आहे💥

परभणी (दि.15 नोव्हेंबर) : सहायक संचालक, नगर रचना कार्यालयातील वर्ग 4 मधील शिपाई  (संख्या 1) या रिक्त पदाचे कामकाज करुन घेण्यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे मान्यताप्राप्त संस्था/कंपनी यांच्याकडून कंत्राटी तत्वावर उमेदवाराची सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी मान्यताप्राप्त संस्था/कंपनी यांचेकडून दरपत्रक मागविण्यात आले होते. परंतु दरपत्रकातील नमूद सुसूत्रता व आवश्यक ती माहिती दरपत्रकात नमूद नसल्यामुळे सदरील प्रकरणी आवश्यक ती पुढील कार्यवाही करणे शक्य होत नाही. त्यामुळे या कार्यालयाकडे प्राप्त झालेली दरपत्रके विभागीय कार्यालयाकडून नामंजूर करण्यात आली आहेत.

याकरीता इच्छूकांनी आपले दरपत्रक या कार्यालयाच्या सूचना फलकावर दर्शविण्यात आलेल्या नमुन्यात, सहपत्रासह सदर प्रसिध्दीच्या दिनांकापासून तीन दिवसात सर्व तपशीलासह या नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग, परभणी यांच्याकडे सादर करावेत असे आवाहन सहायक संचालक, नगर रचना शि.व्यं. जाधव यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या