💥सोनपेठ येथील जिल्हा परिषद शाळेत स्नेहमिलन सोहळा संपन्न.....!


💥जिल्हा परिषद शाळेतील वर्गमित्र तब्बल ४० वर्षानंतर आले एकत्र💥 

सोनपेठ:- येथील जिल्हा परिषद शाळेतील सन १९८२-८३ वर्षाचे वर्गमित्रांचा स्नेहमिलन सोहळा रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आपल्या शाळेतील वर्गमित्राचे स्नेहमिलन सोहळा आयोजित व्हावा ही संकल्पना विजय पिंगळे यांनी काही मित्रांकडे व्यक्त केली सकारात्मक प्रतिसाद मिळताच विजय पिंगळे यांनीच पुढाकार घेतला व सर्व सहकाऱ्यांना एकत्रित करून सदरील कार्यक्रमात अनेक मित्र-मैत्रिनीनी पिंगळे यांच्या या उपक्रमासाठीचा सिंहाच्या वाट्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाची सुरुवात सुध्दा अतिशय धमाकेदार झाली. शिक्षकवृंदाना ११ तोफेची सलामी देत या शिक्षकवृंदाची पुष्पवृष्टी करत शाळेपासुन बालाजी मंदिरापर्यंत मिरवणुक काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या प्रेमाने शिक्षक भारावून गेल्याचे दिसुन आले. या नंतर सरस्वतीपुजन व दिप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कमलाकर चौथवे यांनी स्वागत गीत तर सुनिता महाजन यांनी गणेश स्तुतीचे वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सर्वांत वयोवृध्द शिक्षक रामराव सेलूकर यांनी भुषविले. यावेळी एच.आर.कुलकर्णी. ए.एम.शेरखाने यांनी भाषणे होताच प्रभाकरराव फपाळ सरांच्या कवितेद्वारे मुला-मुलींच्या भावना व्यक्त करताना सर्व सभागृह भावनिक झाली होते. दिपकराव आवाड, नारायणराव पिंगळे, कमलाकर चौथवे यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थी वर्गातुन गणपत गट्टी, अनिल गजें, शर्मिला बुरांडे (शेटे), अनिता सारडा (चांडक), कावेरी कुलकर्णी (रुईकर) यांनी आपली मत व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात रामराव सुपेकर यांचे भावनिक भाषनांनी उपस्थित स्तब्ध झाले. प्रास्ताविक विजय पिंगळे सुत्रसंचलन प्रा.कनकुटे यांनी केले. यावेळी विशेष उपस्थित प्रफुल्ल चामणीकर, सहकार अधिकारी संजय अब्दागिरे, अशोक टोंग यांचा सत्कार करण्यात आला. जेवणानंतर दुसऱ्या सत्रात वर्गमित्रांनी आपला व कार्याचा परिचय देत संवाद साधला यात उषा राजुरकर, सुनिता चीमणगुंडे, वर्षा मानधने, शैलजा लादे, अनघा विरसणीकर, मनोरमा जोशी, निता लोंढे, उषा गर्जे, रत्नमाला परळकर, संजिवनी खेडकर, निर्मला महाजन, आदींनी हिरीरीनी सहभाग घेतला सिद्राम महाजन, बापु भुसारे, दिलीप मोहिते, ज्ञानेश्वर पुरबुज, माधव रंजवे, कांता बर्वे, अनंत लोंढे, बाळासाहेब कुलकर्णी, बाळु देशपांडे,मदन घुगे,सखाराम कांबळे,शेखर लादे, कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र पांडे, दत्ता कुलकर्णी, राजु दहीवाळ, राजु चांडक, सुनिल डाके, शशिकांत गुंजकर, माधव जगताप,आदिंनी परीश्रम घेतली....,


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या