💥कृषि यांत्रिकीकरण खरेदीची महाडिबीटी पोर्टलवर कागदपत्र अपलोड करण्याचे आवाहन......!


💥या योजने अंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ लाभ घेण्यासाठी आपले कागदपत्र अपलोड करावे💥

परभणी (दि.16 नोव्हेंबर) : सन 2022-23 मध्ये कृषि यांत्रिकीकरण व इतर महाडिबिटी योजने अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील इच्छुक लाभार्थी शेतकरी यांनी कृषि यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत ट्रक्टर व इतर ट्रक्टर चलीत औजाराकरीता महाडिबिटी प्रणालीद्वारे अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकरी यांची सोडतीद्वारे निवड झालेली असून, निवड यादी आपल्या नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या योजने अंतर्गत इच्छुक शेतक-यांनी तात्काळ लाभ घेण्यासाठी आपले कागदपत्र, अपलोड करण्यात यावे किंवा ज्या लाभार्थी शेतकरी यांना पूर्व संमती मिळाली असेल अशा शेतकरी यांनी ट्रक्टर व  इतर ट्रक्टर चलीत औजारे तात्काळ खरेदी करुन देयके महाडिबिटी प्रणालीवर अपलोड करावीत जेणे करून निवड झालेल्या लाभार्थी शेतकरी यांना अनुदान अदायगी करणे सोयीची होईल. या बाबत काही अडचण असल्यास आपल्या नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या