💥महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे गिरगांव येथील शेतकऱ्यावर संकटाची मालिका सुरुच....!


💥मागील दिड ते दोन महिन्यातील विजेच्या ताराने ऊस जळण्याची हि चौथी घटना आहे💥

✍🏻शिवशंकर निरगुडे - हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगांव येथे विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे पुन्हा एकदा शेतक-याच्या चार एकर ऊसाची झाली राख रांगोळी शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले.


वसमत तालुक्यातील गिरगांव येथील शेतकरी भुंजग गगांराम क-हाळे  कल्पना न-होबा क-हाळे यांच्या गिरगाव शिवारातील गट क्र.1448 मधील वडगाव फिल्डर वरील ११ केव्ही कंडक्टर चा तार तुटून चार ते पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे तेव्हा आता तरी झोपेच सोंग घेतलेल्या महावितरण विभागाने या कडे लक्ष द्यावे अशी मागणी गिरगांव येथील शेतक-यातुन होत असुन त्वरित विजवितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भुजंग क-हाळे या शेतक-यानी केली आहे


वडगाव फिटर वर भुजंग क-हाळे यांच्या शेतातुन विजेचे तार लोबकळलेले आहेत ते तार उचावुन घेण्याची अनेक वेळा मागणी सदरिल शेतक-यानी विज वितरण कंपणीकडे केली होती पण या मागणीकडे दुर्लक्ष  केल्याने रविवारी दुपारी लोबकळलेला विजेचा तार तुटुन सदरिल शेतक-याच्या तोडणीस आलेल्या ऊसाच्या फडात पडला व ऊसाने पेट घेऊन चार एकर ऊस जळुन खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन शेतक-याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे अगोदरच शेतकरी अस्मानी संकटाच्या सामन्यातुन सावरत नाही तोच विज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणाचा बळी ठरला असुन विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारा विषयी तिव्र संताप व्यक्त होत आहे गेल्या दिड ते दोन महीण्यामधील हि चौथी घटना असुन याकडे विज वितरण कंपणीकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याच्या भावना शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या