💥परभणी शहरातील अहिल्याबाई होळकर नगर व पवनसुत नगर येथे विद्युत पोल बसवा.....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची महावितरण कडे निवेदनाद्वारे मागणी💥

परभणी - शहराअंतर्गत महावितरणच्या एम.आय.डी.सी. सब डिव्हिजन अंतर्गत येणा-या एम.आय.डी.सी. परिसरातील अहिल्याबाई होळकर नगर व खानापुर रोडवरील पवनसुत नगर येथील रहिवाशांनी महावितरण कडे नियमाप्रमाणे कोटेशन भरुन विद्युत पुरवठा घेतलेला आहे असे असतांनाही येथील नागरिकांना विद्युत पुरवठा घेण्यासाठी विद्युत खांबांची उभारणी महावितरण कडुन करण्यात आलेली नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांना लांब अंतरावरुन अनेकांच्या राहत्या घरावरुन धोकादायक पध्दतीने विद्युतपुरवठा घ्यावा लागत आहे. मागील २० वर्षांपासुन अनेकदा विनंती करुनही महावितरणकडुन अद्यापही या भागामध्ये विद्युत खांब उभे केले गेले नाही. नियमाप्रमाणे विद्युत पुरवठा घेणा-या व नियमाप्रमाणे कोटेशन भरणा-या विद्युत ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत विद्युत खांब उभे करुन विद्युत पुरवठा द्यावा लागतो  परंतु महावितरण कडून मागील २० वर्षा पासून अद्याप हि पूर्णपुणे विद्युत पोल बसविण्यात आले नाही त्या मुळे लोकांच्या घरांवरुन धोकादायकरित्या घेतलेला विद्युत पुरवठा अपघाताचे कारण होऊ शकतो.

अहिल्याबाई होळकर नगर व पवनसूत नगर येथे नवीन विद्युत पोल बसवून या परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महावितरण चे कार्यकारी अभियंता यांची भेट घेउन त्यांना निवेदन देण्यात आले.

अहिल्याबाई होळकर नगर व पवनसूत नगर या नगरांचा सर्व्हे करून प्रत्येक विद्युत ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत व्यवस्थितपणे विद्युतपुरवठा करता येईल यापध्दतीचे विद्युत खांब तात्काळ उभे करुन देण्यात यावे. मागण्या मान्य न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने आपल्या कार्यालयाच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल व यावेळी उदभवणा-या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत आपले कार्यालय जबाबदार असेल असे हि या निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके पाटील, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, महिला आघाडी शहर चिटणीस ऍड. सुवर्णाताई देशमुख, महिला आघाडी उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे, शहर चिटणीस वैभव संघई, शाखा प्रमुख जयश्रीताई पारवे, शेख बशीर, सय्यद युनूस, कमलताई दिपके, छायाताई खांडके आदींच्या स्वाक्षर्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या