💥पुर्णेतील शेख रऊफ शेख गौस यांच्या कुटुंबाच्या इमानदारपणाने अक्षरशः भारावले नांदेड येथील चाऊस कुटुंब....!


💥शेख कुटुंबाने प्रवासा दरम्यान रेल्वेत विसरलेली लेडीज पर्स केली चाऊस कुटुंबाच्या स्वाधीन : पर्समध्ये होत्या २ लाखाच्या वस्तू💥 

नांदेड (दि.१८ नोव्हेंबर) : काचिगुडा-अकोला इन्टरसिटी प्रवासी एक्सप्रेस गाडीतून आज शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ०६-२० वाजता काचिगुडा येथून कोच क्र.डि-०१ या कोचमधून नांदेडला येणाऱ्या गालेब चाऊस यांचे कुटुंबातील महिला नांदेड येथे उतरतांना आपली लेडीज पर्स विसरून गेल्या सदरील पर्स याच कोच क्र.डि-०१ मधुन निजामाबाद ते पुर्णा असा प्रवास करणाऱ्या शेख रऊफ शेख गौस यांच्या कुटुंबाला सदरील पर्स मिळाली या लेडीज पर्स मध्ये सोन्याचे १ नेकलेस,मनी/मंगळसुत्र (पत्ता),पायातील चांदीचे चैन,सामसन मोबाईल किंमत अंदाजे १८ हजार रुपये व नगदी ७ हजार रुपये असा अंदाजे २ लाख रुपयांचा मुद्देमाल होता सदरील बाब शेख कुटुंबाने घरी आल्यानंतर शेख रऊफ यांना सांगितली त्यांनी मानुसकीचा भावना जोपासत सदरील लेडीज पर्स व त्यातील मुद्देमाल ज्याचा आहे त्यांच्या स्वाधीन करावा असे कुटुंबास सांगितले सदरील संबंधित चाऊस कुटुंबाला देण्या संदर्भात शेख कुटुंब विचार विमर्श करीत असतांना यावेळी गालीब चाऊस यांचे पुर्णा येथील मित्र अक्षय पदमगीरवार यांच्याशी संपर्क केला व सदरील बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी अक्षय पदमगीरवार यांनी शेख रऊफ यांच्याशी संपर्क केला यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबातील त्यांचे बंधू शेख जमील शेख हमीद यांना बोलावून लेडीज पर्ससह संपूर्ण मुद्देमाल अक्षय पदमगीरवार व शेख जमील यांच्या स्वाधीन करीत त्यांना तात्काळ नांदेड येथे पाठवून गालेब चाऊस यांच्या स्वाधीन करण्यास सांगितले सायं.०५-०० वाजेच्या सुमारास सदरील मुद्देमाल शेख जमील व अक्षय पदमगीरवार यांनी नांदेड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे गालेब चाऊस यांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केला यावेळी त्यांनी शेख रऊफ शेख गौस यांच्या कुटुंबासह अक्षय पदमगीरवार व शेख जमील यांचे आभार व्यक्त करीत त्यांच्या मानुसकी व इमानदारीला सलाम केला.शेख रऊफ शेख गौस यांच्या मानुसकी व इमानदारीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या