💥परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करावेत....!


💥व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य💥

परभणी (दि.16 नोव्हेंबर) : जिल्ह्यातील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. वरील नमूद प्रवर्गातील 11 वी 12 वी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थी समितीकडे वेळेत अर्ज सादर करीत नाही त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभापासून वंचित राहतात. 

जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरीता समितीस पुरेसा अवधी मिळावा. तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासकमात प्रवेश मिळण्यापासून वंचित राहून नये, यासाठी विहीत वेळेत समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वैधता प्रमाणपत्र मिळणेकरीता समितीकडे अर्ज सादर केलेले नाहीत, त्यांनी ज्या जिल्ह्यातील जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे. त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळणेकरीता त्वरीत अर्ज सादर करावेत. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती परभणी या समितीमार्फत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तेंव्हा ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत आपले प्रस्ताव सादर केलेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव www.bartievalidity.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. तसेच त्याची एक प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावी असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र पडताळणी समिती, परभणी यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या