💥जिंतूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात प्राध्यापकाचा मृतदेह आढळला.....!


💥प्राध्यापक जगदीश गव्हाणे हे मृत अवस्थेत आढळून आले विद्यार्थ्यांनी याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिली💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर 

जिंतूर: शहरातील येलदरी रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या उपहारागृहाच्या मागील भागात महाविद्यालयातील एका प्राध्यापकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ :३०  वाजेच्या सुमारास उघडकीस आली.


         याबाबत सविस्तर माहिती अशी की जिंतूर शहरातील येलदरी रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या उपहारगृहाच्या मागील भागात काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राध्यापक जगदीश ज्ञानोबा गव्हाणे हे मृत अवस्थेत  आढळून आले. विद्यार्थ्यांनी याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिली.

       महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सदर घटनेबाबत  तात्काळ जिंतूर पोलीस ठाण्याला दूरध्वनीवरून कळवले. घटनेची माहिती मिळताच जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार, पोलीस कर्मचारी लीला जोगदंड, हाके, अनिल शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी घटनेचा पंचनामा केला असून, जिंतूर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्ह्याची नोंद झाली नाही. सदर घटना ही  आत्महत्या की हत्या याबाबत परिसरात  उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.  घटनास्थळी मृत अवस्थेत असलेल्या प्राध्यापकांचे बूट इतरच पडलेले होते. बाजूला दारूच्या बाटल्या आढळून आल्या, मयताचा मोबाईल गायब आहे. अधिक तपास जिंतूर पोलीस करत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या