💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीला यश......!


💥मटकऱ्हाळा येथील कालवा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात💥

परभणी (दि.२३ नोव्हेंबर) - तालुक्यातील मटकऱ्हाळा शिवारातून निम्न दुधना प्रकल्पाच्या डावा कालवा जातो. या कालव्यावरील ७२ नंबर चारी अनेक ठिकाणी फुटली असून कालव्याला पाणी सोडल्यावर फुटलेल्या चारीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाउन शेतीचे नुकसान होते शिवाय गाळाने भरलेल्या चारी मुळे टेल पर्यंत पाणी न गेल्याने कालवा असूनही सिंचना साठी पाणी उपलब्ध होत नाही या बाबत विभागाकडे व अधिकाऱ्यांकडे अनेक वर्षांपासून तक्रारी व पाठपुरावा करून ही काहीच उपयोग न झाल्याने मटकऱ्हाळा येथील शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी तक्रार करून संबंधित प्रकरणात न्याय मिळवून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.

शेतकऱ्यांच्या या तक्रारी ची तात्काळ दाखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी दि.१८ नोव्हेंबर २०२२ रोजी तक्रारकर्ते शेतकरी व पक्षाच्या शिष्ट मंडळासह श्री. प्रसाद लांब, कार्यकारी अभियंता, माजलगाव काळवा क्र १० यांची भेट घेतली व निम्न दुधना डाव्या कालव्यावरील ७२ नंबर चारी ची दुरुस्ती व चारीतील गाळ साफ करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणीचे निवेदन दिले होते.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीची तत्काळ दाखल घेत श्री प्रसाद लांब यांच्या आदेशाने काल दि.२१ नोव्हेंबर २०२२ रोजी चारी दुरुस्ती व गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली व आज हे काम अंतिम टप्प्यात असून उद्या पासून मटकऱ्हाळा येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्द होणार आहे, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काम मार्गी लावल्याबद्दल शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहे.

आज चारी दुरुस्ती व गाळ काढण्याच्या शेवटच्या टप्प्याच्या कामाची पाहणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केली त्यांच्या सोबत युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर चिटनीस वैभव संघई, जेष्ठ शेतकरी भागवतराव गरुड, मटकऱ्हाळा शाखा प्रमुख उद्धव गरुड, जेष्ठ शेतकरी शिवाजीराव टेलर गरुड, जगन्नाथराव गरुड, श्रीरंगराव हरकळ, संतोष गरुड, पांडुरंग गरुड, शेषराव लिजडे, पवन लिजडे, ज्ञानेश्वर हरकळ, सोपान गरुड, गोपीनाथ गरुड, बाळासाहेब जाधव यांच्यासह शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या