💥पुर्णा तालुक्यातील बळीराजा साखर कारखान्याची सर्व क्षेत्रातील दलालांना हाताशी धरून एकाधिकारशाही....!


💥सर्वसामान्य शेतकऱ्यांसह कामगारांचेही सोशन : शेअर्सच्या नावावर ७ हजार ३०० शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये जमा💥 


💥बळीराजा साखर कारखान्याकडे अठरा कोटी पंचवीस लाख रुपये शेतकरी शेअर्स पोटी जमा💥 

पूर्णा (विशेष वृत्त) : पुर्णा शहरापासून अवघ्या दिड/दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्णा-ताडकळस राज्य मार्गावरील कानखेड शिवारात खाजगी बळीराजा साखर कारखाना हा लातूर जिल्ह्यातील एका मोठ्या उद्योगपत्याने विकत घेतलेला असून संबंधित उद्योगपत्याचे या बळीराजा साखर कारखान्यासह एकंदर तिन खाजगी स्वतःच्या मालकीचे साखर कारखाने असून त्या पैकी बळीराजा साखर कारखाना हा एक आहे या साखर कारखान्याची उभारणी पूर्वी परभणी जिल्ह्याचे भुमीपुत्र भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांनी उभारणी केली होती परंतु परंतु पुरेशा आर्थिक भागभांडवला अभावी चालू करता आला नसल्याने या व्यवसायीक उद्योगपतीने खरेदी करुन योग्य ती यंत्रसामुग्री आणून चालू केला.पूर्णा परिसरासह नांदेड,लातूर,परभणी व वेळप्रसंगी अन्य जिल्ह्यातूनही ऊस आणून गाळप करुन साखर निर्मिती केली जाते. सदर साखर कारखाना हा खाजगी असल्यामुळे सुरुवातीला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शेअर्स घेतल्या गेले नाही. मात्र पुन्हा काही दिवसाला हक्काने ऊस गाळपासाठी नेऊ म्हणून शेतकऱ्यांकडून शेअर्स म्हणून प्रति ऊस उत्पादक शेतकरी २५,०००/- (पंचवीस हजार रुपये) रक्कम घेऊन आता पर्यंत जवळपास ७३०० (सात हजार तिनशे) शेतकरी शेअर्स सभासद म्हणून रक्कम भरवून घेत सुमारे १८ कोटी २५ लाख रुपये रक्कम या बळीराजा साखर कारखान्याने जमा करुन घेतली आहे. आम्ही ईतर साखर कारखान्यापेक्षा ऊसाला अधिक भाव देतोत असा मोठेपण कारखाना मालक सांगत असल्यामुळे शेतकरी अजूनही आमचे शेअर्स घ्या म्हणून मागे लागत आहे.शेअर्स धारक शेतकऱ्यांची संख्या अधिक झाल्याने लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळपाकरीता हा साखर कारखाना नेत नाही.परिणामी ऊसाचे वजन घटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.त्यातही वसीलेबाजी आणि दलालीला प्राधान्य दिल्या जात असल्यामुळे उस उत्पादक शेतकरी त्रस्त झाल्याचे निदर्शनास येत आहे एका शेअर्स धारक ऊस उत्पादक शेतकऱ्याचा केवळ दिडशें टन ऊसच नेण्याची अट संबंधित कारखाना प्रशासनाने घातली असल्याने त्याच्यावर ऊस जर न्यायचा असेल तर दोन शेअर्स घ्यावे लागतील असाही अजब फर्मान कारखाना प्रशासनाकडून शेतकऱ्यांना बजावला जात असल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून बोलले जाते.  


☀️स्थानिक कामगारां दुय्यम दर्जा आर्थिक सोशन :-

नियमानुसार कारखाना खाजगी असो की सहकारी स्थानिक ८०% कामगार असायलाच हवे परंतु संबंधित बळीराजा साखर कारखाना प्रशासनाकडून स्थानिक कामगारांना दुय्यम दर्जा दिला जात असून बाहेरील कामगारांचा मोठ्या प्रमाणात भरणा केल्याचे निदर्शनास येत आहे त्यातही कारखान्यात कामावर असलेल्या कामगारांना अतिशय तुटपुंजी पगार देवून आर्थिक पिळवणूक केली जाते.तसेच पूर्णा तालुक्यातील कर्मचारी कामावर कमी घेऊन बाहेरचे अधिक आहेत.या साखर कारखान्याचे मालक चेअरमन हे माझा कारोभार हा चोख असतो मला खोटे काही जमत नाही,असे सांगून कर्मचारी व शेतकऱ्यांना अंकित ठेवत असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळीपडून नौकर भरती केली आहे. पूर्णा तालूक्यात असंख्य सुशिक्षित बेरोजगार असूनही त्यांना या साखर कारखान्यात काम मिळत नाही. कारखाना खाजगी असल्याचे ठासून सांगत आम्हाला कोणाचे काही देणे घेणे नाही. असेही सांगितले जाते.त्याचबरोबर या साखर कारखान्याचा कारोभार फक्त स्वत मालकच पुण्यावरुन पाहतात. त्यांच्या परवानगी शिवाय एक रुपयाचाही अधिकार कुणास नाही. एक नातेवाईक संचालक येथे नेहमी असतो परंतु त्यांच्याही हाती कोणताच अधिकार ठेवला नसून ते केवळ नामधारी संचालक आहेत.या साखर कारखान्याचे मालक एवढे कोट्याधीश आहेत की, अनेक वेळा ते पुण्याहून कारखान्यावर हेलिकॉप्टरने येजा करतात. कर्मचाऱ्यांना पगार मात्र तुटपुंजी देवून राब राब राबवून घेतल्या जाते येथे कामावर असलेले सर्व विभागातील कर्मचारी गरिबीपायी नाईलाजाने कमी पगारावर नौकरी करतात तरीही कारखाना प्रशासनाला त्या कामगारांची दयामया येत नाही.त्यांना अत्यंत उर्मट भाषेचा वापर करून हिण वागणूक दिली जात असल्याचे कामगारांतून दबक्या आवाजात भित भित बोलल्या जाते स्थानिक कामगारांना कामावर कायम नकरता त्यांना अकरा महिन्यात कामावरून कमी केलौया जाते यानंतर पुन्हा गरजेनुसार कामावर बोलवले जाते कामगार संघटीत होता कामा नयें याची विशेष खबरदारी देखील कारखाना प्रशासनाकडून घेतली जाते त्यामुळे असंघटीत कामगार आपल्या न्याय हक्कापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जातात संबंधित कारखाना प्रशासनाकडून शेतकऱ्यांसह कामगारांचे देखील आर्थिक/मानसिक सोशन केले जात असतांना त्यांना न्याय देणार कोण ? असा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होत असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ.आर.पी प्रमाणे एकरकमी ऊसाचे बिल न देता तीन टप्प्यात बिले दिली जात असतात.अशा पध्दतीने खाजगी कारखाना आहे म्हणून वर्तणूक मिळत असल्याची चर्चा नागरीकातून ऐकावयास मिळत आहे......

💥पुर्णा-ताडकळस राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहन उभी राहत असल्यामुळे रहदारीला धोका...


पुर्णा-ताडकळस राज्य मार्गावरील कानखेड शिवारातील बळीराजा साखर कारखाना प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे ऊस भरलेली वाहन ज्यात ट्रेक्टर/ट्रक/बैलगाड्या मोठ्या प्रमाणात या राज्यमार्गावर दोन्ही बाजुंनी उभी राहत असल्यामुळे रहदारीला प्रचंड धोका निर्माण झाला असून कारखाना प्रशासनाकडून जाणीवपूर्वक अपघातांना निमंत्रण दिल्या जात आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या