💥पुर्णेत फटाके मुक्त दिवाळी साठी अंनिसची जनजागृती.....!


💥महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शालेय विद्यार्थ्यांना पटवून देणार फटाक्याचे दुस्मरिणाम💥

पूर्णा (दि.१३ आक्टोंबर) - नको फटाक्याची वात लावू विवेकाची ज्योती या नावाने पत्रके प्रसिद्ध करित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती फटाके मुक्त दिवाळी अभियानाचा जागर सुरु केला आहे. सोशल मिडिया वर ही विविध माध्यमाव्दारे शालेय विद्यार्थ्यानी फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन केले जात आहे. या अभियानात शालेय विद्यार्थ्यांना फटाक्याचे दुष्परिणाम आरोग्य हानी या विषया ची माहिती दिली जात आहे मागील काही वर्षापासुन माहिती दिलेली आहे त्याचा परिणाम लाखो विद्यार्थ्यानी फटाक्या कडे पाठ फिरवली होती सद्य स्थितीत फटाके फोडण्याच्या बाबतीत पालका सह विद्यार्थ्याची मानसिकता बदलत असल्याचे चित्र दिसत आहे.

अशी करणार जन जागृती : प्रत्येक शाळे मध्ये जाऊन विद्यार्थ्याचे फटाके मुक्त दिवाळीचे महत्व सांगितले जाणार आहे. यासाठीचे संकल्प पत्रही भरली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना फटाके ऐवजी किल्ले बांधणे, पुस्तक खरेदी बाबत आग्रह करणे, मुलांचे बौद्धीक विश्व समृद्ध करण्यासाठी पुस्तकांचा उपयोग होतो या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन डॉ. डी.आर वाघमारे डॉ. आदिनाथ इंगोले आशोक एंगडे, गणेश पाटील डॉ. दिलीप शृंगार पुतळे शेख नसीर अमृत कन्हाळे प्रा राजेश पर्लेकर सुनिल कहाळे आनंद गायकवाड अमन जोंधळे जय एंगडे आदि पदाधिकारी प्रयत्नशिल आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या