💥पुर्णा येथील श्री.गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयात अंतरराष्ट्रीय ओझोन दिवस साजरा...!


💥प्राचार्य डॉ.के.राजकुमार यांच्या हस्ते भिंतीपत्रकांचे अनावरण करण्यात आले💥

पूर्णा (दि.१६ सप्टेंबर)  : आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे बी.एस.सी तृतिय वर्षाच्या विद्यार्थीयांनी पर्यावरण जागृती या अंतर्गत अंतर राष्ट्रीय ओझोन दिवस साजरा केला.

या प्रसंगी अविनाश बहोत ,नासिरा कुलसुम ,महेक अलमास मेहराज पठाण या विद्यार्थीयांनी भिंतीपत्रक तयार करुन ओझोन चे पृथ्वी साठी योगदान व पर्यावरण महत्व सांगीतले .मनुष्यासाठी ओझोन थर अति निल किरणांपासून संरक्षण करते.कार्बन वायूमुळे ओझोन थर कमकुवत होत आहे त्यामुळे वृक्षारोपण करुन ओझोन थर चे संरक्षण करावे अशी माहिती विद्यार्थीयांनी दिली .

प्राचार्य डॉ .के .राजकुमार यांच्या हस्ते  भिंतीपत्रकांचे अनावरण करण्यात आले .मार्गदर्शक म्हणुन प्रा.डॉ.राजू शेख भौतिकशास्त्र प्रा. डॉ .शेषेराव शेटे हे उपस्थित होते.पर्यावरण जागृती म्हणुन हा कार्यक्रम राष्ट्रिय सेवा योजना योजना तर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला .राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.डॉ.पुष्पा गंगासागर व प्रा.डॉ.अजय कुऱ्हे यांनी उत्कृष्ठ भिंतीपत्रक तयार करुन माहिती दिल्या बद्दल विद्यार्थीयांचे अभिनंदन केले या वेळी गजानन भालेराव व मंचक वळसे यांनी मोलाची मदत केली कार्यक्रमाचे सुत्र संचलन नासिरा कुलसूम यांनी केले तर अभार प्रदर्शन अविनाश बहोत यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या