💥पुर्णेतील भिमनगर येथील मंजुषा ताई पाटील यांचा सत्कार संपन्न....!


💥मंजुषा ताई पाटील या एम.ए.हिंदी या विषयांमध्ये प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला💥

पूर्णा (दि.23 सप्टेंबर) - शहरातील भिमनगर येथील सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या विशाखा महिला मंडळाच्या व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी ह्या एम.ए.हिंदी या विषयांमध्ये प्रावीण्य मध्ये उत्तीर्ण झाल्या सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर सभागृह भिम नगर या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार शाल पुष्पहार पेढा भरून त्यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी एम.यू.खंदारे,श्यामराव जोगदंड श्रीकांत हिवाळे उमेश बाऱ्ह टे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास मुंजाजी गायकवाड,डॉ.तूपसमदर,अतुल गवळी पाटील  त्याच प्रमाणे विशाखा ,वैशाली महिला मंडळाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन बौद्धाचार्य त्रबक कांबळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या