💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणवेश वाटप...!


💥यावेळी शालेय समिती उपाध्यक्ष रंजित आवरगंड,पत्रकार तथा प्रगतशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांची प्रमुख उपस्थिती💥 

पुर्णा (दि.२४ सप्टेंबर) तालुकक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज शनिवार दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी उपस्थित विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.


यावेळी शालेय समिती उपाध्यक्ष रंजित आवरगंड,पत्रकार तथा प्रगतशील शेतकरी जनार्धन आवरगंड,समिती सदस्य नवनाथ आवरगंड,सदाशिव आवरगंड,बंडू गाडे,शिक्षणप्रेमी गावकरी,पालक,माणिक आवरगंड अनुरथ आवरगंड लक्षीमन आवरगंड आदीनाथ काळे मुख्याध्यापक संजयकुमार जोशी सर व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत "स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले.यामुळें विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उसंडून वाहत होता.त्यातील काही . विद्यार्थिनीं आपले मनोगत व्यक्त केले दिव्या  आवरगंड गणेश शेरे या दोन विद्यार्थ्यांनी गणवेश मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व जिल्हा परिषदचे व शासनाचे व मुख्याध्यापकाचे आभार व्यक्त केले शाळेचे मुख्याध्यापक यांनी गणवेश  सर्व मुलांना मिळाल्याबद्दल मला खूपच आनंद झाला  व जिल्हा परिषद चा व शासनाचा मी धन्यवाद मानतो अशी प्रतिक्रिया दिली

उपस्थित शिक्षक संजय कुमार जोशी राजकुमार ढगे गजानन पवार राम महाजन सुरज पौळ जोती झटे व वीघ्यार्थ्यी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या