💥दत्तवाडी, शंकरवाडी शिवारातील शेतकऱ्यांसाठी शनिवारी होणार लंपी आजाराचे लसीकरण.....!


💥शेतकरी बांधवांनी या लसीकरण शिबीरात भाग घेऊन आपल्या जनावरांचे लसीकरण करावे - तुळशीराम मुलगीर

महातपुरी जिल्हा परिषद मतदार संघातील दत्तवाडी ,शंकरवाडी शिवारातील शेतकऱ्याच्या जनावरासाठी 24 सप्टेंबर शनिवारी सकाळी आठ वाजता लंपी आजाराचे प्रतिबंधक लसीकरण होणार आहे . 2024 चे परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाचे महातपुरी येथील डॉक्टर कादरी साहेब व तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सावने साहेब यांच्याशी संवाद साधून लसीकरणाची विनंती केली होती. यानुसार सकाळी दत्तोबा संस्थान चे मठाधिपती नागनाथ महाराज पुरी यांच्या उपस्थितीत  दत्तोबा संस्थान परिसरात  लसीकरण होणार आहे. सकाळी 8 वाजता आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी आपापले जनावरे घेऊन यावीत असे आवाहन करण्यात येत आहे. तुळशीराम मुलगीर यांनी यासाठी सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता पशुपालक व शेतकरी बांधवांनी या लसीकरण शिबीरात भाग घेऊन आपल्या जनावरांचे लसीकरण करावे असे आवाहन दत्तवाडी येथील तुळशीराम मुलगीर यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या