💥पुर्णा तालुक्यातील मौ.फुलकळस येथील सार्वजनिक हातपंपाजवळ अनधिकृत शौचालयाच्या टँकचे बांधकाम....!


💥जि.प.शाळेत कार्यरत शिक्षकानेच केले पिण्यास योग्य असलेल्या सार्वजनिक हातपंपालगत संडासाच्या टँकचे बांधकाम💥

पुर्णा (दि.१६ सप्टेंबर) - पुर्णा तालुक्यातील मौ.फुलकळस येथील गावातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी वापर करीत असलेल्या सार्वजनिक हातपंप (बोअर) शेजारीच अगदी चिटकून जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकानेच चक्क अनाधिकृतरित्या संडासच्या टँकचे बांधकाम करण्यास सुरुवात केल्यामुळे सदरील संडास व टँकचे बांधकाम तात्काळ रोखण्यात यावे अशी मागणी गावातील महिला व नागरीकांनी पराभणी जिल्हाधिकारी,तहसिल पुर्णा व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील मौ.फुलकळस गावात एक सार्वजनिक हातपंप बोअर असून या हातपंपाच्या पाण्याचा वापर गावातील गावकरी पिण्यासाठी करतात परंतु जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक माधव विठ्ठल मोरताटे या शिक्षकाने या हातपंपालगतच ग्रामपंचायतीच्या जागेवर अनाधिकृतपणे शौचालय संडासच्या टँकच्या बांधकामास सुरूवात केली असल्यामुळे या शौचालयाचा वापर होण्यास सदरील हातपंपाचे पाणी दुषित होऊन ते पिण्यास योग्य राहणार नाही त्यामुळे सदरील संडासच्या टँकचे अनाधिकृत बांधकाम तात्काळ थांबण्यात यावे अशी मागणी परिसरातील गावकरी मंडळी व महिलांनी निवेदनाद्वारे चक्क जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह पुर्णेच्या तहसिलदार पल्लवी टेमकर पंचायत समिती बिडीओ वानखेडे यांच्याकडे दि.१३ सप्टेंबर २०२२ रोजी केली असून निवेदन देऊन तिन दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर देखील कुठलीच कारवाई नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून या निवेदनावर गंगाबाई श्रीरंग दुधगोंडे,द्वारकाबाई सोपान दुधगोंडे,कौशल्याबाई इश्वर दुधगोंडै,काशिबाई रामा दुधगोंडे,भारतबाई ज्ञानु दुधगोंडे,राजश्री शाहू दुधगोंडे,मंगल सिताराम दुधगोंडे,सोपान जेटीबा दुधगोंडे,श्रीरंग पांडुरंग दुधगींडे,पार्वती लक्ष्मण दुधगोंडे आदींच्या स्वाक्षरी आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या