💥पूर्णेत महिलांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न,देणं समाजाचं परिवाराचा स्तुत्य उपक्रम...!


💥देणं समाजाच परिवाराने 'स्वच्छ मन अन् सुंदर परिसर' या वाक्याची प्रचिती देत राजमुद्रा चौक मार्गाला दिले अक्षरशः स्वर्गाचे रुप💥


पूर्णा (दि.१९ सप्टेंबर) - पुर्णा शहरासह तालुक्यात मागील 10 वर्षेपासून सातत्याने विविध उल्लेखनीय सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या पूर्णेच्या 'देणं समाजाचं परिवार' या समाजसेवी परिवाराने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आणि तो तडीस देखील नेला असून 'स्वच्छ मन अन् सुंदर परिसर' या वाक्याची प्रचिती देत राजमुद्रा चौक परिसरासहा संपूर्ण मुख्य मार्गाला जणूकाही स्वर्गाचे रुप दिल्याचे निदर्शनास येत असून 'देणं समाजाच परिवार' या समाजसेवी परिवारातील प्रत्येक सदस्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

पूर्णा शहरातील दुसरा मुख्य रस्ता असलेला राजमुद्रा चौक परिसरातील रोड ह्या परिवाराच्या अथक प्रयत्नातून प्रत्यक्षात हिरवामय झालाय,रस्त्याने येणारे,जाणारे प्रवासी हा परिसर पाहताच त्यांना ईथे टाकलेल्या बाकावर क्षणभर विश्रांती घेण्याचा मोह आवरतच नाही, इतकी सुंदर झळाळी ,हिरवळ ह्या रोड च्या दुतर्फा झाल्याने प्रत्येकजण देणं समाजाचे परिवाराचे आभार मानताहेत.

ह्यातच आता परिवारातर्फे संत तुकाराम महाराज मंदिराचा परिसर हिरवागार करण्याचं ठरवलंय,याचाच एक भाग म्हणून रविवार दि 18 रोजी स्पेशल महिलांच्या हस्ते या परिसरात तब्बल 120 झाडे लावण्यात आलीत,शहरातील मान्यवर आणि सर्वसामान्य महिलांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात ही वृक्षलागवड करून त्यांचं संवर्धन करण्याची जवाबदारी आता ह्या महिलांनी घेतली आहे.प्रमुख उपस्तिथी मध्ये सौ.मीनाताई कदम,सौ जयश्री वळसे,सौ कांचन इंगोले,सौ सूक्षम जोगदंड,सौ शीला पापंटवार,सौ वर्षा कोत्तावार, सौ सुनीता नलबल वार ह्यांच्यासह कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देणं समाजाचे डॉ.गुलाबराव इंगोले,डी एल उमाटे,सुभाष ओझा ,गोविंद नलबलवार,जगदीश जोगदंड,वसंत पांपटवार, अजमेरा, अतुल शहाणे,प्रविण शिंदे,हभप सोपनकाका बोबडे,प्रा गोविंद कदम, आदींनी परिश्रम घेतले....

✍🏻वृत्त संकलन : केदार पाथरकर पुर्णा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या