💥परभणी येथील कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात आय.टी.सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा.....!


💥परीक्षेत महाविद्यालयातील ९० विद्यार्थींनींसह १२ प्राध्यापकांनी सहभागी होत परीक्षा दिली💥   

             आजच्या युगात संगणकाने अभूतपूर्व क्रांती केली. जग झपाट्याने बदलत असून दररोज नवनवीन संशोधन आणि सेवा,संधीतून विधायक विकास साधला जात आहे.माहिती तंञज्ञानाच्या बळावर विविध जीवनक्षेञात आमुलाग्र परिवर्तन होत असून जग जिंकण्याची ज्ञानलालसा विद्यार्थीनींन मधे वाढीस लागत आहे,ही या विभागाची यशस्वीता होय असे मत प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले यांनी व्यक्त केले.


            कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी संगणक विभागाच्या वतीने माहिती तंत्रज्ञान घटकावर आधारीत सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा दि.१ सप्टेंबर २०२२ रोजी बीसीए आणि एम एस्सी सी एस या विद्याशाखेच्या वतीने घेण्यात आली.या परीक्षेत संगणकाशी संबंधित माहिती तंत्रज्ञानावर आधारित एम.सी.क्यु स्वरूपाच्या परीक्षेत महाविद्यालयातील ९० विद्यार्थींनींसह १२ प्राध्यापकांनी सहभागी होत परीक्षा दिली.

         सदरील स्पर्धेत कु.शितल आगरोया ,प्रथम. कु.सुमय्या शेख, व्दितीय. कु.रितिका अगरवाल,आणि कु. शेख हुमेरा यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना १७ सप्टेंबर रोजी समारंभात गौरविण्यात आले.

          यशस्वी विद्यार्थीनींना नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर, उपाध्यक्ष ॲड किरणराव सुभेदार, सचिव विजयराव जामकर, कोषाध्यक्ष डॉ.अभयराव सुभेदार, सहसचिव डॉ.संजयराव टाकळकर, प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक विभाग प्रमुख प्रा.मोहम्मद खालेद, प्रा.निकिता कुलकर्णी,प्रा. कांचन शर्मा यांचे योगदान लाभले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या