💥राहते घर विकून कर्ज फेडण्यास अडसर निर्माण करणाऱ्या ६९ वर्षीय वृध्द मातेचा मद्यपी कुपुत्रानेच केला दगडाने ठेचून खुन...!


💥पुर्णा तालुक्याती पिंपरण येथील हत्येचा झाला अखेर उलगडा : चुडावा पोलिसांनी घेतले आरोपी कुपुत्राला ताब्यात💥 

पुर्णा (दि.२२ सप्टेंबर) - तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील पिंपरण येथे काल बुधवार दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका  ६९ वर्षीय वृध्द जन्मदात्या मातेची राहते घर विकून कर्ज फेडण्यास अडसर निर्माण करीत असल्याच्या कारणावरून तिच्याच कुपुत्राने निर्दैयीपणे अक्षरशः दगडाने तोंड ठेचून निर्घृण हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले असून तसा कबुली जवाब मद्यपी कुपुत्राने दिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मातेच्या हत्येस जवाबदार असलेल्या त्या आरोपी कुपुत्रास चुडावा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

          अधिक माहीती नुसार गावातील अनेकांचे मद्य सेवन करन्यासाठी मुलाने उधारी उसनवारी केली ती रहाते घर विकुन देन्यासाठी जन्मदाती माय विरोध करत होती म्हणून संध्याकाळी मीच विटाने व दगडाने मारले असे मुलानेच तपासात  कबुली दिली . या घटने संदर्भात आज बुधवार (ता .२१) सप्टेंबर रोजी सकाळी गावचे पोलिस पाटील यांच्याकडून माहिती मिळताच चुडावा पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शिवप्रकाश मुळे यांना  फौजदार पंडीत,पोहेकाँ.सावंत,पोहेका रफिक शेख,पोकाँ.मिटके या आपल्या सहकारी पोलिस पथकासह पिंपरण येथील घटनास्थळावर दाखल झाले हत्या झालेल्या वयोवृध्द महिलेचे नाव सुलोचनाबाई शंकरराव सोनटक्के असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजते या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळावर उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रम्हानंद गावडे हे देखील दाखल झाले व त्यांनी हत्ये संदर्भात सखोल चौकशी केली या घटने संदर्भात चुडावा पोलिस स्थानकात प्रथमतः अज्ञात आरोपी विरोधात कलम ३०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु पोलिस प्रशासनाने घटने संदर्भात सखोल तपास केला असता असे निदर्शनास आले की मयत महिलेचा मुलगा आरोपी मारोती शंकरराव सोनटक्के राहणार पिंपरण यानेच दारूच्या नशेत दगडाने मारहाण केल्यामुळे मयत सुलोचनाबाई सोनटक्के या वृध्द मातेला आपला जिव गमवावा लागला चुडावा पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले असल्याचे समजते पुर्णा तालुक्यात चोवीस तासात दोन हत्येच्या घटना घडल्यामुळे पोलिस प्रशासन देखील हादरले असून जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी अवघ्या तासातच पिंपरण हत्येच्या घटने प्रकरणी चुडावा पोलिस स्थानकासह पुर्णा पोलिस स्थानकाला देखील भेट दिली होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या