💥पुर्णा येथील स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रताप कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश....!


 💥प्रदेश सरचिटणीस भरत घनदाट यांच्या नेतृत्वात केला जाहीर प्रवेश : पक्षाकडून मिळणार मोठ्या पदाची जवाबदारी💥

पुर्णा (दि.१८ सप्टेंबर) - येथील स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष युवकांचे आयकॉन प्रताप कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भरत दादा घनदाट यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला असून प्रताप कदम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे पक्षाला शहरासह तालुक्यात बळकटी मिळणार असून प्रताप कदम यांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका धाडसी युवा नेता लाभल्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

यावेळी पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी दयानंद दादा कदम,नगरसेवक शेख खुदुस शेख बशीर,नगरसेवक अमजद साहब नुरी,बाळू भाऊ जोगदंड,युवा नेता रोफ बागवान,बाबा पठाण, मुजीब पठाण, इशू पठाण, अन्वर पठाण,कैलास कदम अमोल पळसकर,संतोष सातपुते आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती...!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या