💥आगामी जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत भाजप-रासप मित्र पक्षांना साथ द्या - आ.डॉ.रत्नाकर गुट्टे


💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील शेतकरी मेळाव्यात बोलतांना आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले प्रतिपादन💥

पुर्णा/ताडकळस (दि.२५ सप्टेंबर) - ग्रामीण विकासाची नांदी म्हणून जिल्हा परिषद/पंचायत समिती कडे बघितले जाते त्यामुळे ग्रामीण भागांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी दोन्ही सभागृहात आपली सत्ता असणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय समाज पक्ष मित्रमंडळाच्या उमेदवारांना आपण विजयी करा विकासासाठी आपण सदैव आपल्या सोबत राहू असे प्रतिपादन गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.

पुर्णा तालुक्यातल्या ताडकळस येथे आज रविवार दि.२५ सप्टेंबर रोजी आयोजित शेतकरी मेळाव्यात आ.डॉ.गुट्टे बोलत होते पुढे बोलताना आ.डॉ.रत्नाकर गुट्टे म्हणाले सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला तरीही आपण सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कधीही मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळेच सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत सर्वसामान्य मतदार जनता आपल्याशी एकनिष्ठ राहिली यात नोंद घ्यावी अशी घटना म्हणजे आपण तुरुंगात असताना जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला याचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. 

 ताडकळस येथील गट क्र.३१२ मधील रहिवाशांचा "जागा खाली करा" हि समस्या कायमस्वरूपी सोडवित असल्याचे सांगत या साठी तुम्ही निचिंत रहा असे आवाहन केले आपण नेहमीच दिव्यांग व्यक्तींना मदत करत असतो याचाच एक भाग म्हणून लवकरच गंगाखेड , पालम व पुर्णा येथे मेळावा घेऊन त्यांच्या उपचारासाठी , अवश्यक असणारे साहित्य देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

येत्या नोव्हेंबरमध्ये मुंबई , पुणे येथील कंपनीचे पदाधिकारी येत असून या मतदारसंघातील किमान दोन हजार सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिली जाईल याची हमी आ.गुट्टे यांनी दिली. शेतीसाठी अत्यावश्यक असणारे पाणी , विज व रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही असेही ते म्हणाले. 

ताडकळस येथील मार्केट यार्डात आयोजित मेळाव्यचे अध्यक्ष फुलकळस सोसायटीचे चेअरमन डिगांबर आण्णा शिराळे हे होते तर स्वागताध्यक्ष म्हणून मित्रमंडळाचे युवा पुर्णा तालुकाध्यक्ष मारोती आण्णा मोहिते हे होते. यावेळी ताडकळस,फुलकळस,खांबेगाव , आदी पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्त्यांनी रासप आ.गुट्टे काका मित्रमंडळात प्रवेश केला. व्यासपीठावर धन्याकुमारजी शिवनकर , बालाजी रूद्रवार,विकास आंबोरे,प्रल्हाद मुरकुटे शिवाजी आवरगंड  ,गणेश कदम  शे. गुलाब शे.नबी साहब आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारोती मोहिते,व्यंकटेश पवार,विलास जाधव,मदन आंबोरे,सुरेश गायकवाड,अनिल आंबोरे,माधव दुधगोंडे,पांडुरंग मोरताटे,पिंटू घोडके,उत्तम आंबोरे,आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.ताडकळस सह परिसरातील असंख्य महिला,पुरुष उपस्थित होते......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या