💥औषधी दुकानदारांचे कोरोना महामारी काळातील योगदान विसरून चालणार नाही - जगदीश जोगदंड सर


💥पुर्णा तालुका मेडीकल आसोशिएशनच्या वतीने आयोजित औषधी दुकानदारांच्या सत्कार समारंभा वेळी बोलतांता ये म्हणाले💥 

 पूर्णा (दि.२६ सप्टेंबर) - पुर्णा तालुका मेडीकल आसोशिएशनचे अध्यक्ष अजयसिंह ठाकूर यांच्या वतीने आज सोमवार दि.२६ सप्टेंबर २०२२ रोजी शहरातील औषधी दुकानदारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ कलावंत जनसामान्यांच्या मनातील आदर्श व्यक्तीमत्व तथा शिक्षक व दैनिक सकाळचे पत्रकार सन्माननीय जगदीश जोगदंड या सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलतांना म्हणाले की कोरोना महामारी काळात माणसे कोरोनाच्या भितीमुळे घराबाहेर निघण्यास धजावत नसताना शहरासह तालुक्यातील औषधी दुकानदारानी आपल्या जिवाची यत्किंचितही पर्वा न करता धावपळ करत मिळेल तेथून औषधी उपलब्ध करून आपले अर्थात जनसामान्यांचे आरोग्य जपले त्यांची ती रुग्न सेवा डॉक्टरां ईतकीच मोलाची आहे.असे गौरवोद्गार जगदीश जोगदंड यांनी औषध दुकानदारां विषयी काढले.

पुर्णा तालुका मेडीकल आसोशिएशनच्या वतीने शहरातील औषधी दुकानदारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन आसोसिएशनचे अध्यक्ष डॉ अजयसिंह ठाकुर यांनी केले होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानी कैलासआप्पा कापसे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश जोगदंड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रवीण अग्रवाल,बंसिलालजी वर्मा,विजय भालेराव उपस्थित होते. यावेळी उपस्थित औषधी दुकानदारांचा  मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांनी कोरोना काळात केलेल्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कोरोना काळात  डॉक्टर मंडळींच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या केमिस्ट बंधूना मात्र कोणीही कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित केले नाही याची खंत वाटते अशी भावना केमिस्ट ॲंड ड्रगिस्ट आसोसिएशनचे जिल्हा प्रतिनिधी प्रवीण अग्रवाल यांनी व्यक्त केली. प्रमुख उपस्थितात उत्तमचंद मुथा , बालाजी भांगे , सचिन जैस्वाल, शशांक पौळ , कपील किरडे , किरण सुर्वे ,हरीश गव्हाणे , मुंजाजी लोखंडे, पंकज कोठारी, शेख मोमेजभाई ,सिकंदर खान आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.अजयसिंह ठाकुर यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या