💥सातशे वर्ष गुलामीचे तर अमृत महोत्सवी 75 वर्ष स्वातंत्र्याचे....!


💥17 सप्टेंबर 1948 हैदराबाद मुक्तिसंग्राम हा या भागाचा स्वातंत्र्यदिन💥

सातशे वर्षाहून अधिक दख्खनचे पठार परकीय आक्रमकांच्या आधिपत्याखाली  राहिले कर्नाटक मधील गुलबर्गा रायचूर बेल्लारी सह 27% कानडी प्रदेश मराठी भाषिक मराठवाडा तेलगू भाषिक तेलंगणा आणि भाग्यनगर म्हणजेच हैदराबाद या भागाने सातशे वर्षांहून अधिक कालावधी परकीय आक्रमकांच्या अधिपत्याखाली आपले सांस्कृतिक धार्मिक राजकीय  मूल्य कशी जोपासली असतील. यावर मराठी इतिहास मौन आहे. 1295 पासून या भागाच्या परधर्मीय पर सांस्कृतिक आक्रमण आणि पराजे होय अल्लाउद्दीन खिलजीने  दख्खनचे प्रवेशद्वार अजय दुर्ग देवगिरीचा पाडाव केला.


 देवगिरीचे सम्राट यादव  हे भगवंत श्रीकृष्ण यांच्या वंशातले असे तुर्की लेखक लिहितात.नव्हे तर इस्तांबुल विद्यापीठामध्ये तसे नमूदही आहे.देवगिरीच्या युद्धानंतर समृद्ध देवगिरी ची बाजारपेठ आणि प्रचंड मोठी नगरी ज्याची लोकसंख्या साधारणता तीन लक्ष होती.खिलजीने अक्षरशः गवत भाजीपाला कापावा तशी माणसे मुलेबाळे माता  भगिनींच्या अब्रुची विटंबना प्रचंड मोठ्या प्रमाणावर केली व देवगिरी निरवंश करून टाकला. भारतीय इतिहासकार यावर मौन बाळगतात.

 मराठी इतिहासकारांना तर दक्षिणेतील हैदराबाद संस्थानांमध्ये अत्याचार झाली हेच मुळात मान्य नाही.दक्षिणेतील प्रवेशद्वार प्राचीन देवगिरी अजय देवगिरी किल्ल्याचा पाडाव झाल्यानंतर खिलजीने अकुत धनसंपदा लुटली त्याच धनसंपत्ती वर त्याने स्वतःच्या  काका व सासरा यांचे शिरकाण करत  दिल्लीच्या सत्तेवर ताबा मिळवला.यादवांची वारसदार त्यांची मोठी मुलगी तिला ते जबरण आपल्याबरोबर घेऊन गेले. दिल्ली ते इस्तांबुल असा प्रवास त्या माऊलीला करावा लागला.


केवळ यादवांशी आहे म्हणून त्या राजघराण्यातील मुलीचे 27 निकाह सहा वर्षात करण्यात आले. दख्खनचे पठार असलेल्या मराठवाड्याने खूप काही  परकीयांचे घाव झेलले आहेत. मुळातच" गुलामांचा इतिहास त्यांचे मालक विजेता म्हणजेच देवाचे रूप अशा पद्धतीने स्वतःचे वर्णन करत त्यामुळे त्यांनी केलेल्या अत्याचारांचा इतिहास जगासमोर कधीच आला नाही. आणि तो येतही नसतो. गुलामांचा पराजित यांचा इतिहास अपमानित करण्यासाठी विजेते व मालक लोक आपल्या सोयीसाठी आपण कसे शूर वीर आणि उदारमतवादी होतो असे लिखाण करून घेण्याची पद्धत होती आणि तोच खोटा इतिहास आमच्या इतिहासकारांनी भारतीय स्वातंत्र्यानंतरही भारतीयांच्या माथी मारला. त्यामुळे दक्षिणेच्या पठाराने सातशे वर्ष परकीय गुलामगिरी मध्ये काय भोगले काय सोसले याचा उल्लेख कुठेच सापडत नाही" आधुनिक काळामध्ये या इतिहासाला एकत्रित करत किंबहुना त्याच्या स्मृती पुनरजागृत करण्याचे  महत्त्वाचे योगदान  फार कमी लोकांनी दिले.

 भारताच्या स्वातंत्र्यानंतर वर्षांहून अधिक कालावधी लोटूनही निजाम भारतात सामील झाला नाही.यावरून इंग्रज त्यावर किती मेहरबान होते व त्यावेळचे काँग्रेस नेतृत्वही किती महान आणि मेहरबान होते हे लक्षात यावे.आपणा सर्वांना ऑपरेशन पोलो शिकवल्या जाते त्याकाळचे मिलिटरी चे जनरल चौधरी यांचे कुशल नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तीनच दिवसांमध्ये रजाकार सैन्याचा  व निजामाचा पूर्णपणे जायचे झाला.

 भारताचे तत्कालीन गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांचा निर्णय आणि स्वामी रामानंद तीर्थ व त्यांचे लाखो अनुयायी सहकारी यांच्या आत्म बलिदानातून हैदराबाद निजाम संस्थान पराजित झाले. त्यासाठी नामी अनामी शेकडो हजारो लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या स्मृती येणाऱ्या पिढ्यांना कराव्या यासाठी 1995 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेले शिवशाहीचे सरकार शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. त्याकाळी शिवसेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख व  सत्तांतर यानंतर मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष श्री दिवाकररावजी रावते साहेबांनी मराठवाड्यातील गाव तांड्यावर पायपीट करत असताना गावागावात तांडा वाड्या वरती रझाकारांनी केलेल्या अत्याचाराचे दाखले व अत्याचाराच्या कथा यांचे गाठोडे आपल्याबरोबर ठेवले आणि वेळ आल्यानंतर मात्र परभणीचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय  आर. डी. देशमुख साहेब, व हेमराज जैन साहेब यांच्या पुढाकाराने आदरणीय संभाजीनगर खंडपीठाकडे हा प्रश्न मांडला पुरावे सादर केले आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाने 17 सप्टेंबर 1948 हा स्वातंत्र्य दिन विधिवत जाहीर झाला.

 त्याकाळी केंद्र व राज्यांमध्ये एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल केला आणि तो प्रस्ताव जशास तसा अटलजींच्या सरकारने मान्य केला आणि मराठवाड्याला 17 सप्टेंबर 1948 हा स्वातंत्र्य दिन लोक उत्सव व स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली म्हणून साजरा होऊ लागला. यामागचे खरे सूत्रधार हे आदरणीय दिवाकर रावजी रावते साहेब आहेत हे सर्वमान्य व सर्वज्ञात आहे

 हैदराबाद मुक्तिसंग्राम व मराठवाडा मुक्तिसंग्राम स्वातंत्र्य सैनिकांच्या आत्मबलिदानाचा इतिहासाचे पुनरुज्जीवन करण्याचे कार्य वाटते तेवढे सोपे नव्हते परंतु ज्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असतात तेच इतिहासाला का लक्ष्मी देतात होय हैदराबाद मराठवाडा मुक्ती संग्रामाला पुनर्जीवित करण्याचे कार्य गावोगावी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या निधीतून हैदराबाद मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्मारकाचे पुन्हा पुनर्निर्मिती करण्याचे कार्य एकट्या एक हाती आदरणीय शिवसेना नेते दिवाकर रावजी रावते साहेब यांनी केले हे त्यांची राजकीय विरोधक सुद्धा मान्य करतात. आणि ते त्रिकालाबाधित सत्य ही आहे.

 मित्रांनो त्यांनी हुतात्मा स्मारकांचे निर्मिती करत असताना हुतात्मा स्मारकाची निर्मिती त्याची भव्यता त्याचे सौंदर्य त्यावर हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांची स्मृती चित्र जशास तशी उभारणी करणे यासाठी त्यांनी केलेली मेहनत यावर मी एक स्वतंत्र लेख लिहिणार आहे. दिलेला शब्द पाळणे हा आदरणीय  दिवाकर रावजी रावते साहेबांच्या स्वभावातला  मूळ स्वभाव गुण मराठवाडा आणि महाराष्ट्र ओळखून आहे. भाग :पहिला अपूर्ण लेखक राजकीय सामाजिक विश्लेषक: सतीश सातोनकर. परभणी मराठवाडा महाराष्ट्र....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या