💥परभणीत ‘हर घर तिरंगा’ हर घर पोषण कार्यक्रम उत्साहात साजरा...!


💥या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आंचल गोयल या होत्या💥

 परभणी (दि.11 आगस्ट) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत ‘हर घर तिरंगा - हर घर पोषण’ व जागतिक स्तनपान सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प कार्यालय परभणी यांच्या वतीने करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आंचल गोयल या होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाल विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत कार्यरत महिला बचतगट, महिला संस्था, महिला मंडळ व कार्यालयाने संकलित केलेला 25 हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी गोयल यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. त्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केशरी, पांढरा, हिरवा अशा तीन रंगामध्ये तयार केलेल्या 75 सकस आहार पाककृतीचे प्रदर्शन ठेवण्यात आले. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. यावेळी 75 अंगणवाडी सेविका तिरंगी रंगाच्या गणवेशात उपस्थित होत्या. तसेच 75 गर्भवती महिला व स्तनदा मातांना जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष भेट देऊन बाळाच्या प्रत्येक वाढदिवसानिमित एक वृक्ष लावणे बाबतचा संदेश देण्यात आला. एकात्मिक बाल विकास सेवायोजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारी बेबी केअर किट महापालिका आयुक्त देविदास पवार यांचे हस्ते लाभार्थी महिलांना देण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाधिकारी यांनी महिलांच्या आरोग्य व पोषणा बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जिल्हाधिकारी गोयल यांनी महिलांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दररोज थोडा वेळ देणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पर्यवेक्षक विद्या दानेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी रुपाली रंगारी यांनी केले. जागतिक स्तनपान सप्ताह दि. १ ते ७ ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो व या सप्ताहातून महिलांना स्तनपानाचे महत्व व बाळाचे आरोग्य याबाबत विविध संदेश देण्यात येतात. कार्यक्रमास महापालिका आयुक्त देविदास पवार, वैद्यकिय अधिकारी कल्पना सावंत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण जाधव, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, महिला संस्था, गटाचे प्रतिनिधी, गर्भवती महिला, स्तनदा माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या