💥जितूर शहरात मोकाट जनावरांचा रस्त्यावर चक्काजाम....!


💥नगर परिषद प्रशासनाने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे💥

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी. रामपूरकर

जिंतूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग परभणी ते फालेगाव हा जिंतूर शहरातून जिंतूर येलदरी मार्गे मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून या जनावरामुळे रहदारीला अडथळा येत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे

जिंतूर शहरातून येलदरी- रिसोड- वाशिम हा राष्ट्रीय महामार्ग रस्ता जातो हा रस्ता मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा एकमेव रस्ता आहे जिंतूर शहरात परभणी रोड  ते येलदरी रोड वर छत्रपती शिवाजी चौक पासून पुढे रस्त्यावर दुभाजक बसवण्यात आले आहेत. शहरातील या मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. छत्रपती शिवाजी चौक ते येलदरी रोड मोंढा परिसर त्यातच भाजी मंडई ,बँका याच रस्त्यावर असल्यामुळे पादचारी दुचाकी स्वारासह मोठ्या वाहनांची वर्दळ असते. याच मुख्य रस्त्यावरील मोंढा बाजार भाजी मंडई ,बँका  हा परिसर गजबजलेला असतो. या ठिकाणी सकाळपासूनच मोकाट जनावरे ठिय्या करून बसतात एखाद्या वेळेस ही जनावरे अचानक उभे राहून कोणत्याही दिशेने पळ काढतात त्यामुळे पादचारी व वाहन धारकाची अचानक तारांबळ उडते. त्याच बरोबर मोकाट जनावरामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तरी नगर परिषदेने याकडे वेळीच लक्ष देऊन मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या