💥जिंतूरात रक्तदान शिबिरात 75 रक्तदात्यांनी केले रक्तदान.....!


💥शहरातील जानिमिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने ओमप्रकाश शेटे यांच्या अभिष्टचिंतन निमित्त शिबीराचे आयोजन💥         

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी. रामपूरकर

जिंतूर शहर व परिसरातील थायलेसिमीया ग्रस्त बालकांसाठी ओमप्रकाश शेटे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त जानिमिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात आज मंगळावर दि.16 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

              शहर व परिसरात बहुसंख्येने थायलेसिमीया ग्रस्त बालकांचे प्रमाण असल्यामुळे दर महिन्याला सदरील बालकांना मोठा रक्ताचा पुरवठा लागतो. त्या रक्त साठ्याची पूर्तता करण्यासाठी शहरातील जानिमिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने ओमप्रकाश शेटे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास जगताप आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ रविकिरण चांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या शिबिरात परिसरातील 75  रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात डॉ सौ परिहार, डॉ अर्चना भायकर, डॉ विनोद राठोड यांनी काम पाहिले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शे,वाजीद, डॉ,समीर जानिमियाँ, अॅड. इम्रान शेख, शे,शाहरुख, सोहेल जानिमियाँ, अरबाज शेख, शे,आवेज, शुन्नू लाला, शे झीशान, आसिफ खान, आमीन लाला, शे मखसुद, आत्मराम जठाळे, राजकुमार पितळे, विठ्ठल शिंदे, करण अडणे, डॉ,रियाज, डॉ,आफ्रीन, राम ठेंगळे, शे मुंतजीर, साजिद खान, दीपक झाडे आदींनी परिश्रम घेतले...,.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या