💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातिल महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


💥…तर सिंघानिया रुग्णालयात १०० ते १५० लोकांचा मृत्यू झाला असता ; एकनाथ शिंदेंनी

✍️ मोहन चौकेकर

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विश्र्वासदर्शक ठरावाच्या परिक्षेत पास; दुसरी लढाईही जिंकली,एकनाथ शिंदे व भाजपच्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी  जिंकला

* देवेंद्र फडणवीस सर्वात नशीबवान अडीच वर्षात ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही : अजित पवार

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कट्टर शिवसैनिक,पण त्यांचा अनेकवेळा पंख छाटण्याचा प्रयत्न; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला.

* पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भीमावरम दौरा ; थोर क्रांतीकारक अल्लुरी सीताराम राजूंच्या पुतळ्याचे अनावरण, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डीही उपस्थित*

* हिमाचलमध्ये बस दरीत कोसळली:कुल्लूमध्ये खासगी बसचा अपघात,लहानग्यांसह 16 ठार, बचावकार्य सुरु. 

* CBSE 10th Results 2022 : दहावीवीचा निकाल  उद्या*

*केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) निकालाची देशभरातील लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत.*

* ५ जुलै रोजी निकाल जाहीर करू शकते.

* कट्टर शिवसैनिक ते ४० दिवसांचा तुरुंगवास; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करताना विधानसभेत मांडलेले १० मुद्दे.

* एकनाथ शिंदे व भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी जिंकल्यानंतर फडणवीसांनी केले भाषण.

* Facebook ची मोठी कामगिरी; मे महिन्यात भारतातील १.७५ कोटींहून अधिक कंटेन्टवर केली कारवाई मेटाच्या या मासिक अहवालात भारताबद्दल म्हटलं गेलंय की फेसबुकने १ मे ते ३१ मे २०२२ या कालावधीत १.७५ कोटींहून अधिक कंटेन्टवर कारवाई केली*

* पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली घोषणा.

* शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा युती सरकारचा निर्धार.

*…तर सिंघानिया रुग्णालयात १०० ते १५० लोकांचा मृत्यू झाला असता ; एकनाथ शिंदेंनी सांगितला आनंद दिघेंच्या मृत्यूनंतरची ती आठवण हा दिघेंवरील प्रेमामुळे झालेला उद्रेक होता असं मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी भाषणात नमूद केलं.

* 20 लाखांच्या खंडणीसाठी पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलाचं अपहरण; 6 तासात आरोपींना केलं जेरबंद; अपहरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग.

*पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलाचं अपहरण करून 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

* “१६ लेडीज बार मी स्वत: तोडलेत; १०० हून अधिक गुन्हे माझ्यावर दाखल” अधिवेशनात एकनाथ शिंदे आक्रमक.

* विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली.

* “नरेद्र मोदी त्यांच्या सावकार मित्रांच्या कोळसा खरेदीसाठी राज्यांवर दबाव टाकत आहेत”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप.

*तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरए पक्षाचे प्रमुख के.चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

* ईदीला हिंदूंसाठी मातेसमान गायींचा बळी देऊ नका, बद्रुद्दिन अजमलांचे मुस्लिमांना आवाहन*

*ईदच्या दिवशी हिंदूंसाठी मातेसमान असणाऱ्या गायींचा बळी देऊ नका, असं आवाहन AIUDF चे सर्वेसर्वा बद्रुद्दीन अजमल यांनी केलं आहे.*

* शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन; उद्धव ठाकरे घेतला आढावा* *मुख्यमंत्री एकनाथ* *शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने बहुमत चाचणीत विजय मिळवल्यानंतर शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

* भारताकडे ३५० पेक्षा जास्त धावांची आघाडी; दुसऱ्या डावात धावफलक दोनशेपार.

* India vs England 5th Test : पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाकडे २-१ अशी आघाडी आहे. 

✍️ मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या