💥कारंजा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड,रोख रकमेसह सहा मोटारसायकली जप्त....!


💥मानोरा रोड वरिल पारस टायर्स दुकानात चालू होता जुगार अड्डा💥

वाशीम:-दिनांक ०१/०७/२०२२ रोजी १७/१५ वाजता गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, काही ईसम हे मानोरा रोड वरिल पारस टायर्स दुकानात ५२ तास पत्यावर एका बादशाह नावाचा जुगाराचा खेळ पैशाचे हारजितवर खेळत अशी माहीती मिळाल्याने मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सा.पो. नि. ए. एस. सोनोने यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि/ सुनिल खंडारे, पो.हे. कॉ. / १२४० गजानन वर, ना.पो.कॉ. ११२४ अजय जायभायेना.पो.कॉ./१०१७उमेश बिबेकर ना. पो. कॉ. / ९९२ सुनिल टाले, पो.कॉ. / ७९९ गणेश गावंडे पो.स्टे. कारंजा शहर यांनी दोन पंचा समक्ष मिळालेल्या खबरे प्रमाणे मानोरा रोड वरिल पारस टायर्स दुकानात येथे जुगार रेड केली असता काही ईसम त्यांचे मोटर सायकलने आलेले दुकानाचे हॉलमध्ये गोलाकार मध्ये बसुन एक्का बादशाह नावाचा जुगार पैशाची बाजी लावुन जुगार खेळतांना मिळुन आले त्यांचे ताब्यातुन पंचा समक्ष ९२५० रू. नगदी व सहा मोटर सायकल किंमत अं. १,५०,०००/-रू.असा एकुण १,५९,२५०/- रू.चा. माल मिळुन आल्याने महाराष्ट्र जुगार अॅक्ट प्रमाणे कार्यवाही करण्यात आली सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि/ सुनिल खंडारे पो.स्टे. कारंजा शहर हे करीत आहे.

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या