💥हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट....!


💥सावकाराकडून पैसे काढून बि-बियाणाची जुळवाजुळवी💥 

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा येथील अनेक शेतकऱ्याना अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे पेरणी केली आहे त्यावर मुसळधार पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाहीत त्यामुळे आत्ता शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे पाहिलेच तर खत बी घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळाले नाही त्यामुळे सावकाराकडून पैसे काढून बी बियाणाची जुळवाजुळवी केली आत्ता पुन्हां बियाणे कुठून आणावे हा प्रश्न अनेक शेतकऱ्याना पडला आहे.

पाहिले साखरा मंडळात हत्ता मंडळात पाऊस देखिल उशिरा पडला त्यामुळे अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत पाहिले पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या आत्ता पाऊस जास्त पडत असल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत साखरा  हिवरखेडा येथे आत्ता पण 40% शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत 

हिवरखेडा येथील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे  प्रशासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्था कडून केली जात आहे ?

गेल्या सात दिवसा पासून सततधार पाऊस पडत त्यामुळे अनेक सोयाबीन पिकांची वाढ देखिल खुटली आहे सात दिवसा पासून सूर्यदर्शन नाही ? आज सकाळ पासून पुन्हां मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या अजुन पण बाकी आहेत पाहिले तर पाऊस लेट आला आत्ता उघडीप देत नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत

माझ्या शेतातील चार बैग सोयाबीन अतिवृष्टीमुळे ते बियाणे उगवलेच नाही आत्ता दुबार पेरणी चे संकट ओढवले आहे पाहिलेच तर इकडून तिकडून बियानाची जुळवाजुळवी केली आत्ता पुन्हां पेरणी करण्यासाठी माझ्या कडे पैसे नाहीत प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामा करून मला पेरणी साठी बियाणे ऊपलब्ध करून द्यावे...... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या