💥हिंगोली ते सेनगाव या राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे हळदवाडी गाव💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येतून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हळदवाडी गावात जाण्यासाठी रस्ता नाही.पावसाळ्यात पावसाचे पाणी आणि उन्हाळ्यात हिवाळा आणि उन्हाळ्यात शेतकऱ्याच्या शेतातील पाणी यामुळे वर्षातील सर्व १२ महिने या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. चिखलाने भरलेले खड्डे तुडवत प्रवास करावा लागत असल्यानं नागरिक बेजार झालेत.हिंगोली तालुक्यातील या गावच्या आजूबाजूचे खेड्या-पाड्यात अतिदुर्गम भागात सुद्धा चकचकीत रस्ते झालेत. मात्र, हिंगोली ते सेनगाव या राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हळदवाडी गावात जाण्यासाठी स्वातंत्र्य काळापासून रस्ताच नाही.
* ५० घरांचे हळदवाडी गाव असून ४०० च्या आसपास लोकसंख्या आहे :-
५० घरांचे हळदवाडी गाव असून ४०० च्या आसपास लोकसंख्या आहे.या गावात कुणबी, आदिवासी,बौद्ध, वारली , आदि समाज्याची लोक राहत आहेत. गावात जाण्यासाठी नागरिक ज्या रस्त्याचा वापर करत आहेत. ती जागा एका स्वतंत्र मालकाची मालकी हक्काची असल्याने गावातील स्थानिक राजकारणामुळे तिसऱ्या पिढीपासून जागा मालकाने पूर्ण गावाला वेठीस धरले असून मालक गावात जाणारा रस्ताच करून देत नाही. त्यासाठी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून उपोषणही केले होते उपोषण स्थळी प्रशासन व अधिकारी यांनी भेट देऊन हा तत्काळ रस्त्याचा प्रश्न मार्गी लाऊ असे आश्वासन दिले होते मात्र पुढे काहीच झाले नाही हा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला आहे
गावातील नागरिकांना गावात जाण्यासाठी रस्ता व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी जागा मालकाशी मिटिंग करून रस्ता व्हावा यासाठी अनेक वेळ प्रयत्न केले आहेत. त्यांच्या अटी शर्यती ही मान्य केल्या आहेत.स्वतःच्या फायद्यासाठी जागा मालकाने रस्ता देण्यासाठी अनेक वेळ होकार सुद्धा दिलेला परंतु “रात गेली की बात गेली” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
* रुग्णांना न्यावे लागते खांद्यावर :-
गावात कुणी आजारी पडले तर मुख्य रस्त्यापर्यंत त्या रुग्णाला उचलून न्यावे लागत आहे. शाळकरी मुलांना शाळेत जातांना चिखलातून व आत्ता पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे,गावात मयत झाले किंवा कोणता ही कार्यक्रम असला तर त्यावेळी बाहेरील पाहुण्यांना गावापर्यंत जाण्यासाठी पायी चिखलाची व पाण्यातून वाट तुडवत जावे लागत असल्याने पाहुणे अक्षरशः गावातील नागरिकांना शिव्याच देऊन जातात.
हळदवाडी गावातील नागरिकांना ही वाटत आहे की,आपल्या गावाचा रस्ता ही तालुक्यातील गावांसारखा झाला पाहिजे, स्वातंत्र्य काळापासून तालुक्यातील हळदवाडी हे गाव चकाचक रस्त्यापासून आतापर्यंत मुकले आहे.याकडे अधिकारी लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत आहे याकडे संबंधितानी लक्ष देऊन गावात जाण्यासाठी पक्का रस्ता करून द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्था कडून केली जात आहे.....
0 टिप्पण्या