💥शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर....!


💥नव्याने मतदार याद्या तयार करण्यासाठी मतदार याद्याचा पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला💥

परभणी (दि.22 जुलै) : भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली व राज्याचे मुख्य  निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार औरंगाबाद विभाग शिक्षक विधान परिषदसाठी संभाव्य निवडणूक 2023 साठी  शिक्षक मतदार संघाकरिता नव्याने मतदार याद्या (de-novo) तयार करण्यासाठी मतदार याद्याचा पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. 

मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (३) अन्वये जा‍हीर सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक शनिवार    1 ऑक्टोबर 2022 असा आहे. मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (४) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी शनिवार दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (४) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुनरप्रसिध्दी मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर 2022  रोजी करण्यात येणार आहे. नमुना १९ व्दारे दावे व हरकती  सोमवार दि. 7 नोव्हेंबर 2022 या अंतिम दिनांकापर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. हस्तलिखित तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई शनिवार दि. 19 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात येणार असून बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहेत. बुधवार, दिनांक 23 नोव्हेंबर 2022 ते शुक्रवार दिनांक. 9 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून रविवार दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आंचल गोयल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे..... 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या