💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स....!


💥मध्यावधी निवडणुका झाल्यास शिवसेना १०० जागांवर विजयी होईल,शिवसेना नेते संजय राऊत यांचा दावा💥

 ✍️ मोहन चौकेकर                                            

* मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसाची जोरदार हजेरी तर मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी.

* मध्यावधी निवडणुका झाल्यास शिवसेना १०० जागांवर विजयी होईल,शिवसेना नेते संजय राऊत यांचा दावा.

* नाशिक मनपा निवडणूकीसाठी प्रशासन 'ऍक्टिव्ह मोड'वर,325 अधिकाऱ्यांची नेमणूक.

* दीड लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पालघरमधील वसईचे नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांना अटक,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

* दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड ; कराचीत केलं इमर्जन्सी लँडिंग

* एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार? फडणवीस म्हणतात, देवेंद्र फडणवीस म्हणाले “या सगळ्यात गडबडीत आम्हाला त्यासंदर्भात बैठक घेण्यासाठी वेळच मिळाला नाहि*

* व्हॉट्सॲप स्टेटसवर स्वत:ला श्रद्धांजली वाहत प्रेमभंगातून तरुणाची आत्महत्या आत्महत्येपुर्वी या तरूणाने भ्रमणध्वनीवरील व्हॉट्सॲप स्टेटसवर विरह गीताची ध्वनी चित्रफित प्रसारित केली होती.

 * सानिया मिर्झाची मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक ; भारताच्या आशा पल्लवित*

* Wimbledon 2022 Semifinal : सानियाने क्रोएशियन साथीदार मेट पेव्हिकसह विम्बल्डनमधील मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

* वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची चाकूने भोसकून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद ‘सरल वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजी यांची कर्नाकमधील हॉटेलमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

* पुढील पाच दिवस पावसाचे ; मुंबईत सतर्कतेचा इशारा : गेल्या दोन दिवसांपासून आणि उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबईतील विविध ठिकाणचे सखलभाग जलमय झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.

 * राज्यभरातील तरुण-तरुणी ‘रेव्ह पार्टी’साठी नागपुरात ; समाज माध्यमांवरून जाहिरात पोलिसांचा छापा आणि पार्टीत पळापळ पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांना मध्यरात्री रेव्ह पार्टीची माहिती मिळाली होती

* दिल्ली ते दुबई जाणाऱ्या स्पाईट जेटच्या विमानाची कराचीत इमर्जेन्सी लॅंडींग भारतीय विमान वाहतूक विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन आठवड्यातली ही ६ वी इमर्जेन्सी लॅंडींग आहे.

* पावसाळी पर्यटन पुन्हा टाळेबंद; बदलापुरजवळील कोंडेश्वर, बारवी धरण परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू पावसाळी पर्यटनासाठी  प्रसिद्ध  असलेल्या बदलापुरजवळील कोंडेश्वर,  बारवी धरण परिसरात ठाण्यापासून हजारो पर्यटक येत असतात.

* कोथरुडमधील गुंड शरद मोहोळ तडीपार कोथरुड भागात दहशत निर्माण करणाऱ्या गुंड शरद मोहोळला शहरातून तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिले.

* मुसळधारेने पूल कोसळला, सहा गावांचा संपर्क तुटला देवळी शहराशी संपर्काचे माध्यम असलेला यशोदा नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे कोसळला.

* नोकरीसाठी कायपण! बंगळूरूतील युवक झोमॅटोची टीशर्ट घालून पेस्ट्रीच्या बॉक्समध्ये डिलीव्हर करतोय रेझूमी ट्विटरवर झोमॅटो टी-शर्ट आणि पेस्ट्रीचा बॉक्स घातलेले स्वतःचे फोटो देखील त्याने शेयर केले आहेत....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या