💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या हेडलाईन्स.....!


💥नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरुच💥 

  ✍️ मोहन चौकेकर 

* मोठी बातमी :  विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये ; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

* नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरुच ; दोन दिवसांपासून वडगाव येथील गावकऱ्यांचा शहराशी संपर्क तुटला 

* शिवसेना शिंदे गटाचे विधिमंडळाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या गाडीला मुंबईत अपघात;* घाटकोपर ते मंत्रालय दरम्यानच्या फ्री वेवर हा अपघात झाला; फ्री वेवर आठ गाड्यांची एकमेकांना धडक

* कोल्हापूर : 30 वर्षीय डॉक्टर तरुणीनं स्वत:च इंजेक्शनचा ओव्हर डोस घेत केली आत्महत्या ; अपूर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे असं मुलीचं नाव असून तिचे आई वडीलही डॉक्टर आहेत

* बीडमध्ये गोगलगायीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचं नुकसान ; हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाई द्या : आमदार धनंजय मुंडे

* नाशिक जिल्ह्यास गुरुवारपर्यंत रेड अलर्ट,700 मिलीमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता

* नागपुरात गणेश मूर्तीच्या उंचीवरुन नवा वाद ; मंडळांसह, मूर्तीकारांची नाराजी

* सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्यच, सेनेच्या याचिकेला आता अर्थ राहिला नाही : दीपक केसरकर

* पावसाचा कहर, नदी नाल्यांना पूर ;  मुख्यमंत्री शिंदे तातडीने गडचिरोली दौऱ्यावर 

* धनुष्यबाण वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे धाव; केली ही महत्वाची मागणी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात उघड दोन गट पडले आहेत.

* विदर्भात पावसाचा जोर कायम; नागपूरच्या हिंगणा तालुक्यात माय-लेकी वाहून गेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री गडचिरोलीला पोहचणार

* या आजीचा नादच खुळा! वयाच्या ९४व्या वर्षी जागतिक स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक : चेन्नई येथे झालेल्या नॅशनल मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही भगवानी देवींनी तीन सुवर्णपदके जिंकली होती.

* गॅस, वीज दरवाढीवरून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोदी सरकार, शिंदे सरकार विरोधात आंदोलन : गरिबी, महागाई आणि बेरोजगारीचे मुखवटे घालून तरुणी आंदोलनामध्ये सहभागी

* “सैन्यात असंतुष्ट मुलं गेली तर…”; अग्निपथवरून मेघालयच्या राज्यपालांचे मोदी सरकारवर टीकास्र शेतकरी आंदोलनाच्या काळापासून सत्यपाल मलिक मोदी सरकारवर टीका करत आहेत.

* मोबाईल हिसकावल्याने संतापून मुलाने मुंबई गाठली ; दोन दिवसानंतर लागला शोध पोलिसांनी सूत्रे हलवून त्याचा शोध घेतला. मुंबईतून त्याला ताब्यात घेऊन नागपुरात आणले.

* ठाण्यात ७४ पैकी २९ अतिधोकादायक इमारतीच रिकाम्या ठाणे, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारती आहेत.

* बँका पैसे परत करण्यास असमर्थ ; चीनमध्ये आंदोलकांवरच सरकारची कारवाई, ठेवीदारांना फरफटत नेलं आधीच लॉकडानमुळे मोठा आर्थिक सहन करावा लागलेल्या लाखो लोकांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं असून दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

* मुंबईत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू ; दिवसभर काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून मुंबईत १४ जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या