💥पूर्णा येथील पंचायत समितीत मुख्यकार्यकारी आधिकाऱ्यांनी रोपटे लागवड करून उपक्रमाची केली सुरुवात.....!


💥रोपट्याची लागवड करून संगोपन केले तर पर्यावरणाचे समतोल राखले जाईल - ओमप्रकाश यादव उपमुख्य कार्यकारी आधिकारी

पूर्णा (दि.२३ जुलै) - रोपट्याची लागवड करून संगोपन केले तर पर्यावरणाचे समतोल राखले जाईल अन्यथा पृथ्वीवर सजीवांना जगणे अवघड होईल म्हणुन वाईट दिवस येण्याअगोदर वृक्ष लागवड करावे असे आवाहन उपमुख्य कार्यकारी आधिकारी ओमप्रकाश यादव यांनी केले.


          पंचायत समिती पूर्णा येथे हर घर झेंडा व वृक्षा लागवड उपक्रमा अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमात मंगळवार ( ता .19)  ओप्रकाश यादव बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षा गट विकास आधिकारी सुनिता वानखेडे, कृषी आधिकारी बी जी दहीवडे, कार्यक्रमाधिकारी किरण बनसोडे ,तांत्रिक सहाय्यक अरूण राठोड़, श्री पोटे , साहेब सुरेवाड, कृषी प्रगतीशील शेतकरी 

 जनार्धन आवरगंड , प्रगतीशील शेतकरी गोविंद दुधाटे ग्रामविकास आधिकारी ए. आर .लाडेकर यांची उपस्थिती होती.

     पुढे बोलतांना ओमप्रकाश यादव म्हणतात " एकाच खंड्यात दर वर्षी रोपटे लागवड करून सोपस्कार करण्यापेक्षा माणुसकीच्या नात्याने रोपाला जागवले तर आत्मिक समाधान लाभेल त्यातूनच सत्कार्य घडते " रोपटे लागवड करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमासाठी सरपंच, ग्रामसेवक ,शेतकरी आधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार किरण बनसोडे यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या