💥जालना येथून रागाच्या भरात घर सोडून निघून गेलेल्या त्या महिलेला रेल्वे सेना टिमने सुखरूप नातेवाईकांच्या केले स्वाधीन...!💥जालन्याच्या रेल्वे सेना टीम व रेल्वे सेना खबर पक्की ग्रुपच्या माहिती वरून महिलेस शोधण्यात रेल्वे सेना टिमला यश💥

जालना (दि.१३ जुलै) : जालना येथुन नवऱ्या सोबत भांडन झाल्याने रागाच्या भरात स्वतःच्या ८ महिन्यांच्या बाळाला घरीच सोडून घरातून निघून गेलेल्या २१ वर्षीय महिलेला रेल्वे सेना टीम ने धावत्या नंदीग्राम एक्सप्रेस मधून पोटूल ते लासुर दरम्यान ताब्यात घेऊन तिची समज काढून तिला तिच्या कुटुंबाकडे सुखरूप स्वाधीन करण्यात येणार आहे.

जालन्याच्या रेल्वे सेना टीम व रेल्वे सेना खबर पक्की ग्रुपच्या माहिती वरून सदरील महिलेस शोधण्यात रेल्वे सेना टिमला यश आले असून या शोधकामी शिल्लेगाव पोलीस प्रशासन व रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी मोलाचे सहकार्य केले.

मुंबई नांदेड नंदीग्राम एक्सप्रेस ने औरंगाबाद येथे रेल्वे पोलीस स्थानकात सदरील महिलेस सुरक्षित थांबवण्यात आले होते या संदर्भात नातेवाईकांशी संपर्क संपूर्ण साधल्याने नातेवाईक जालना हुन औरंगाबाद येथे दाखल होणार असून यानंतर रेल्वे पोलीस प्रशासना मार्फत सदरील महिलेस नातेवाईक यांच्या कडे देण्यात येणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या