💥भारतीय डाक विभागाकडून डायरेक्ट एजंट’ (विमा सल्लागार) भर्तीकरीता मुलाखती....!


💥यामध्ये उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी 18 वर्षं व जास्तीत-जास्त 50 वर्ष असावे💥

परभणी,(दि.12 जुलै) : डाक विभागाकडून डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजने अंतर्गत ‘डायरेक्ट एजंट’ (विमा सल्लागार) भर्तीकरीता मुलाखती घेण्यात येणार असुन यासाठी पुढील प्रमाणे पात्रता आवश्यक असणार आहे.

यामध्ये उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी 18 वर्षं व जास्तीत-जास्त 50 वर्ष असावे. तसेच अर्जदार हा 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावा ज्यात केंद्रीय राज्य मान्यता प्राप्त घेतली आहे. बेरोजगार/स्वयं बेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य आदी टपाल जीवन विमा साठी थेट असे अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायीक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान स्थानिक भागाची माहिती असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारास NSC / KVP च्या स्वरूपात रु. 5 हजाराची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. तात्पुरत्या स्वरुपात परवाना हा IRDA ची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केली जाईल. परंतू उमेदवारास IRDA ची परीक्षा 3 वर्षेच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहणार आहे. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर असणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज भरुन 22 जूलै रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत अधिक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी - 431 401 येथे थेट मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखतीच्या वेळी बायोडाटा, मुळ कागदपत्र, प्रमाणपत्र / अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ‘डायरेक्ट एजंट’ (विमा सल्लागार) करीताचे अर्ज डाकघर अधिक्षक कार्यालय, परभणी विभाग, परभणी येथे उपलब्ध असल्याचे अधिक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी यांनी कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या