💥पुर्णा तालुक्यातील खुजडा ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक रस्त्यावरील साचलेल्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा....!

 


💥प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदनाद्वारे केली मागणी : आमरण उपोषणाचाही दिला इशारा💥

पुर्णा (दि.१३ जुलै) - तालुक्यातील खुजडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील सार्वजनिक रस्त्यावरती पावसाच्या पाण्यासह  नाल्यांतून वाहणारे गलिच्छ सांडपाणी मागील चार ते पाच वर्षापासुन ग्रामस्थांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत असून यामुळे जनसामान्यांच्या आरोग्याला धोका निर्माण करीत असल्यामुळे सदरुल पाणी प्रश्न तात्काळ मार्गी लागावा या मागणीसाठी पुर्णा पंचायत समितीच्या बिडीओ यांना प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकारी व गांवकरी मंडळींच्या वतीने निवेदन देण्यात आले.


सार्वजनिक रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्या लगत अंगणवाडी असुन या अंगणवाडी शाळेत लेकराना जाता येत नाही गावातील डिलेव्हरी पेशंट अपंग बांधव म्हातारे व गावातील संर्वाचे हाल हाल होत आहेत त्या साठी बिडीओ मॅडम यांना निवेदन दिले आहे व बिडीओ मॅडम खुजडा येथील त्या रस्ताची गावात येऊन पाहणी केली आहे ..जर 8 दिवसात हे रस्ताचे काम नाही झाले तर  गावातील संपूर्ण मंडळी यांना रस्ता जाण्यासाठी मोकळा करण्यात यावा  अन्यथा खुजडा येथील गावकरी मंडळी व प्रहार चे कार्यकर्ते प स पुर्णा येथील ऑपीस समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे ..निवेदन सादर...प्रहार उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड , प्रहार तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के पिंपरणकर, सर्कल प्रमुख खुजडा गजानन कुऱ्हे, प्रहार सर्कल प्रमुख चुडावा श्रीहरी इंगोले, संतोष कुऱ्हे (चेअमन खुजडा), मंचक कुऱ्हे ,नितीन कदम, भारत भाकरे, राम कुऱ्हे इ. उपस्थित

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या