💥परभणी जिल्ह्यात रिलायन्स ऐवजी ‘आयसीआयसीआय’ ची नियुक्ती....!


💥प्रधानमंत्री पिकविमा योजना : खरीप हंगाम - २०२२💥 

परभणी (दि.०२ जुलै) :  प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत या खरीप हंगाम - २०२२ साठी परभणी जिल्ह्यात ‘रिलायन्स’ ऐवजी ‘आयसीआयसीआय लोबार्ड इन्शुरन्स कंपनी लि.’ ची नियुक्ती करण्यात आली आहे.

        पिकविमा योजनेकरीता या जिल्ह्यात रिलायन्स इन्शूरन्स या कंपनीची तब्बल दोन वेळा नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, या कंपनीने या जिल्ह्यात पिकविमा वितरण करतेवेळी सर्वसामान्य शेतकर्‍यांना अक्षरशः वेठीस धरले. बहुतांशी शेतकर्‍यांना पिकविमा वितरीतच केला नाही. यावर्षीच्या हंगामात सरसगट पिकविमा वितरीत करणे अपेक्षित असतांना ४५ पैकी केवळ ८ महसूल मंडळातच पिकविमा वितरणास सुरुवात झाली आहे. रिलायन्सने यातून नाकर्तेपणा, उदासीनता दाखवून दिली आहे.

        या पार्श्‍वभूमीवर रिलायन्स विरोधात या जिल्ह्यात तीव्र भावना पसरल्या असतांना या खरीप हंगामात रिलायन्स ऐवजी आयसीआयसीआय लोबार्ड इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीद्वारे आता जिल्ह्यात पिकांना विमा संरक्षण दिले जाणार आहे.

         ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर व कापूस या सात पिकांना ७० टक्के जोखीम स्तर राहणार असून ज्वारीस २९ हजार ७२०, बाजरीस २५ हजार, सोयाबीन ५५ हजार, मूग २२ हजार, उडीद २२ हजार, तूर ३६ हजार ८०२ व कापसास ५५ हजार विमा संरक्षित करण्यात आला आहे.  विमा हफ्त्याचा दरही निश्‍चित करण्यात आला असून प्रति हेक्टरी शेतकरी हिस्सा, प्रति हेक्टरी केंद्राचा हिस्सा, प्रति हेक्टरी राज्याचा हिस्साही निर्धारीत करण्यात आला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या