💥परभणी जिल्ह्यातील 667 गावातील जमिनींची ड्रोनद्वारे मोजणी व सर्वेक्षण....!


💥मुळ गावठानातील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येणार💥

परभणी (दि.19 जुलै) : महा-स्वामित्व योजनेअंतर्गत भारतीय सर्व्हेक्षण विभाग, डेहराडुन, ग्रामविकास विभाग व भूमि अभिलेख विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहभागाने परभणी जिल्ह्यातील गावठाण जमीनीची ड्रोनद्वारे मोजणी व सर्वेक्षण करण्यात येत आहे.

परभणी जिल्ह्यातील 667 गावांचे मुळ गावठानातील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम / नगर भूमापन नियमानुसार प्रक्रीया पुर्ण करुन गावठाणातील सर्व मिळकत धारकांना मिळकत पत्रिका (Property Card) आणि सनदचे वितरण करण्यात येणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्यात सेलु तालुक्यातील 78 व सोनपेठ तालुक्यातील 31 गावांचे ड्रोन सर्व्हेक्षणाचे काम पुर्ण झाले आहे. त्यापैकी 37 गावांत चौकशीचे काम देखील यशस्वीरीत्या पुर्ण झाले असून या गावांतील मिळकत धारकांना लवकरच (Property Card) व सनदचे वितरण करण्यात येणार आहे.

ड्रोन मोजणी व सर्वेक्षणामुळे गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार केला जाणार आहे. प्रत्येक घर, खुली जागा, रस्ता, गल्ली, नाला, यांना नगर मापक क्रमांक दिला जाणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदीनुसार गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मिळकत प्रमाणपत्र तयार केले जाणार असून जिल्ह्यातील नागरिकांना या मोजणीचा फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख डॉ. वसंत निकम यांनी दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या