💥परभणी जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी जिल्ह्यातील विविध संघटना स्वच्छेने देणार 2 लाख झेंडे...!


💥यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते💥

परभणी (दि.20 जुलै) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार असुन, जिल्ह्यात हे अभियान यशस्वी आणि उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटना सहभागी होवून स्वच्छेने 2 लाख झेंडे देणार आहे.


‘हर घर तिरंगा’ अभियान नियोजनाचा एक भाग म्हणुन आज जिल्ह्यातील विविध संघटनानी देखील सहभागी व्हावे यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा, सहाय्यक राज्यकर आयुक्त धनंजय देशमुख, संजय कृषी उत्पान्नद बाजार समितीचे सचिव यशवंतराव तळणीकर, परभणी मार्केट व्या‍पारी असोसिएशनचे अध्यक्ष  मोतीलाल जैन, औद्योगीक संघटनाचे अध्यक्ष  ओमप्रकाश जगन्नाथजी डागा, मशिनरी असोसिएशनचे अध्यक्ष  राजेश दुधगांवकर,  मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री, कॉम्यु. असोसिएशनचे अध्यक्ष नितेश शहा, फर्टीलायझर असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद दत्ताराव आरमळ, फर्टीलायझर असोसिएशनचे , उपाध्यक्ष, संतोष अनंतराव हराळे,  किराणा मर्चंट असोसिएशनचे कोषाध्यषक्ष श्रीनिवास भालचंद्र रुद्रवार, सी.ए.असोसिएशनचे , अध्यक्ष गोकुळ  अग्रवाल,   अलमास वाहतुक, हमाल सहकारी संस्थेचे अध्यक्ष सय्यद अथर, कर सल्लागार संघटनाचे अध्यक्ष राजकुमार शंकरराव भामरे यांची उपस्थिती होती.

‘हर घर तिरंगा’ या अभियानात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच आपल्या घरावर तिरंगा फडकविला जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालय, ग्रामपंचायत, महानगर पालिका, नगर पंचायत, विविध संस्थाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज डौलाने फडकवावा यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येत आहे.
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी 3 लाख तर शहरी भागासाठी  1 लाख असे एकुण 4 लाख झेंडे जिल्ह्यात फडकविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. या उद्दिष्टानुसार विविध माध्यमातून या अभियानाला लागणाऱ्या झेंड्याचा पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार आज जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, शिवभोजन केंद्र यांच्या बैठकीचे आयोजन करुन त्यांना या राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांना आपल्या घरावर झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रध्वज उपल्बध व्हावा याकरीता जिल्ह्यात विविध ठिकाणी विक्री केंद्र सुरु करुन अगदी माफक दरात राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्याचे प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येत आहे. परंतू नागरिकांनी ध्वज संहितेनुसार आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा मान-सन्मान राखत राष्ट्रध्वज फडकवला जाईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी यावेळी केली.
आपल्या देशाप्रती प्रेम भावना व देशाभिामान व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर तिरंगा’ या अभियानात सर्व नागरिकांनी स्वंयस्फूर्तीन सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी मनपा आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.
यावेळी उपस्थित जिल्ह्यातील विविध संघटनानी ‘हर घर तिरंगा’ या अभियानात सक्रीय सहभागी होणार असल्याचे सांगितले. तसेच या अभियानासाठी सर्व संघटनामार्फत  स्वच्छेने 2 लाख झेंडें देणार असल्याची माहिती दिली.
यावेळी बैठकीस जिल्ह्यातील गोपाळ शिंदे, जीवन पैठणकर, सतिष हरीरामजी दरगड श्रीमती मनिषा संजय केंद्रे, सौ.रत्नामाला सिंगणकर, सौ.मिनाताई बालासाहेब चव्हाण,  श्रीमती सुमित्रा गुलाबराव लझगे, कल्पमना जगन्नारथ दळवी, बागडे बारडजी मारोतीराव,  सुरेश मुंजाजी जाधव, लक्ष्मीनारायण जोशी, शेख जावेद शेख अब्दुल, सिद्धेश्वर बैकरे, महेश कोकडे, शाम जाधव, एच. के. मोरे आदींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या