💥परभणी स्थानकावर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आल या रेल्वेच जोरदार स्वागत💥
परभणी(दि.16 जुलै) - मराठवाडयातून आज 16 जुलै,शनिवार पासून पंढरपूर मार्गे नांदेड-हुबळी दरम्यान नवीन साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू झाली परभणी स्थानकावर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने या रेल्वेच जोरदार स्वागत करण्यात आले .
. नांदेड-हुबळी रेल्वे नांदेड येथून दर शनिवारी दुपारी 2.10 वाजता निघून पूर्णा 2.40, परभणी 3.15, गंगाखेड 3.50, परळी वैजनाथ सायंकाळी 4.40, पुढे लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्सी, कुर्डवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा जंक्शन, धारवाड स्थानकावरून हुबळी येथे दुसर्या दिवशी सकाळी 9 ला पोहोचणार आहे. परतीत हुबळी येथून दर रविवारी सकाळी 11.15 ला निघून त्याच मार्गाने परळी वैजनाथ दूसरा दिवशी सकाळी 3.45, गंगाखेड 5.05, परभणी 5.45 पूर्णा 6.35 आणि अखेर नांदेड येथे सकाळी 8 ला पोहोचणार आहे.*
या गाडीमुळे
तुळजापूर, पंढरपूर, मिरज येथून 40 किमी अंतरावरील कोल्हापूर महालक्ष्मी, हुबळी येथून गोकर्णा, मुरुडेश्वर येथील मंदिरांच्या दर्शनासाठी जाणार्या भक्तांसाठी, तसेच लोंढा जंक्शन येथून 4 तासाच्या अंतरावरील दूधसागर धबधबा, सोबत 5 तासाच्या अंतरावरील गोव्याला जाणार्या पर्यटकांना सोय होणार आहे. आज या गाडीचे परभणी स्थानकावर प्रवासी महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले . यावेळी रेल्वेचे चालक आर मीना आणि नवीन कुमार यांचे स्वागत करण्यात आले या वेळी अरुण मेघराज,प्राचार्य सुरेश नाईकवाडे, रितेश जैन,रुस्तम कदम,कादरीलाला हाशमी, वसंत लंगोटे,आर.के.सिंग उपस्थित होते....
0 टिप्पण्या