💥नारळ फोडून उद्घाटन कोणीही करा....श्रेयवादात आम्हाला रस नाही - प्रहार जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने
परभणी - परभणी तालुक्यातील दुधना नदीवरील परभणी ते वाडी दमई रस्त्यावरील हिंगला येथील पुलाचे व बंधाऱ्याचे काम मागील तीन वर्षापासून अर्धवट अवस्थेत रखडलेले होते. परिसरातील गावातील नागरीकांनी प्रहार जनशक्ती पक्ष परभणीकडे अर्धवट राहिलेल्या पुलाचे काम प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून पूर्ण करून द्यावे अशी विनंती केली होती. या प्रकरणाची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकारी व संबंधीत गावकऱ्यांसह दि. २८ फेब्रुवारी २०२२ सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री डी.जी. पोत्रे साहेब यांची भेट घेऊन तात्काळ पुलाचे काम सुरु करा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता.
दिनांक ०३ मार्च २०२२ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हिंगला पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलाचे काम तात्काळ सुरु करण्याची सुबुद्धी यावी म्हणुन सुबुद्धी महायज्ञ आंदोलन घेण्यात आले. या आंदोलना नंतर ही पुलाचे काम सुरु न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात साप सोडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी यावेळी दिला होता. आंदोलनाची दखल घेत मा. अविनाश धोंडगे, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांच्या आदेशावरुन परभणी येथील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयात दिनांक १० मार्च २०२२ रोजी वरिष्ठ अधिकारी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्यांची संयुक्त बैठक होऊन त्यात दि ३१ मे २०२२ पर्यंत संबंधीत हिंगला पुलाचे अर्धवट काम पूर्ण करण्यात येईल असे लेखी अश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाने पुढील नियोजीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात साप साडण्याचे आंदोलन मागे घेतले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या आश्वासना नुसार संबंधीत हिंगला पुलाचे काम दि. २० जून २०२२ रोजी पूर्ण होऊन संबंधीत पुल दि. २५ जून २०२२ पासून जनतेसाठी वाहतुकीस खुला होणार आहे. या पुलाच्या रखडलेल्या कामांना सुरुवात करण्याचे श्रेय काही लोकप्रतिनिधी येत असूत जनता जनार्धन सर्व जनते प्रहार जनशक्ती पक्षाने केलेल्या आंदोलनामुळे व पाठपुराव्यामुळेच मागील तीन वर्षापासून रखडलेल्या हिंगला पुलाचे काम पूर्ण झाले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने जनतेला दिलेला शब्द पाळल्यामुळे करडगाव, सनपुरी, हिंगला, वाडी दमई, साडेगाव, पिपळा, मिर्झापूर, सावंगी खुर्द, बोबडे टाकळी, जोडपरळी व पिंगळी कोथळा या गावच्या नागरीकांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.ना. बच्चूभाऊ कडु व प्रहार जनशक्ती पक्ष परभणी आभार मानले आहेत. हिंगला पुलाच्या रखडलेल्या कामास सुरुवात करण्याचे श्रेय हे प्रहार जनशक्ती पक्षाचे असून या पुलाचे नारळ फोडुन उदघाटन कोणीही करा केवळ नारळ फोडुन उद्घाटन करण्यात प्रहार जनशक्ती पक्षाला आजिबात रस नाही अशी भूमिका प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी जाहिर केली आहे.
या पुलाच्या पाठपुराव्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे , झरी सर्कल प्रमुख शाम भोंग, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे, दिव्यांग आपाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, वाहतुक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, विष्णु गोल्ड, मिडिया प्रभारी नकूल होगे, शहर चिटणीस वैभव संघई, शेख बशीर यांच्यासह परिसरातील गावातील नागरीकांनी आंदोलनात सहभाग नोंदविला होता.....
0 टिप्पण्या