💥पतंजली योगपीठ हरिद्वार द्वारे पूर्वी चालवले जाणारे निशुल्क योग शिबिरे यांचे रूपांतर आता इंटिग्रेटेड योगा प्रॅक्टिस मध्ये....!


💥...आता इंटिग्रेटेड योगा प्रॅक्टिस - बापू पाडळकर

 परभणी (दि.०७ जुन २०२२) - पतंजली योगपीठ हरिद्वार द्वारे पूर्वी चालवले जाणारे निशुल्क योग शिबिरे यांचे रूपांतर आता इंटिग्रेटेड योगा प्रॅक्टिस मध्ये करण्यात आले आहे व या धर्तीवरच 21 जून चा आंतरराष्ट्रीय योग दिन सुद्धा संपूर्ण देशातील 75 विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. यावर्षी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन 'मानवतेसाठी योगा' या संकल्पनेवर आधारित आहे असे प्रतिपादन पतंजली योगपीठ हरिद्वार भारत स्वाभिमान शाखेचे राज्य प्रभारी बापू पाडळकर यांनी शहरातील महेंद्र नगर येथील दक्षिण मुखी मारुती मंदिरात आयोजित जिल्हा सभेमध्ये व्यक्त केले

याप्रसंगी भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी धोंडीराम शेप, पतंजली जिल्हा प्रभारी निखिल वंजारे, किसान जिल्हा प्रभारी बाळासाहेब गजमल, युवा भारत जिल्हा प्रभारी अनिल बडगुजर, सोशल मीडिया जिल्हा प्रभारी गोपाळ मंत्री, गजानन बोरीकर, आदींची उपस्थिती होती. बैठकीमध्ये शहरात व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अतिशय मोठ्या प्रमाणात व नियोजनबद्ध पद्धतीने योग दिन साजरा करण्या संबंधी उपस्थित सर्व योग साधकांना सूचना केल्या. तसेच भारत स्वाभिमान चे ॲप डाऊनलोड करून त्यावर आपल्या सर्व गती विधींची नोंद करणे ,सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे या व इतर बाबींविषयी मार्गदर्शन केले. बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कर्मठ योगशिक्षक तथा तहसील प्रभारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या