💥नॅझरीन नर्सेस ट्रेनिंग कॉलेज रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल मध्ये रक्तदाता दिवस संपन्न...!


💥कार्यक्रमासाठी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे,रक्त संक्रमण अधिकारी एच.एस.मुंडे यांची प्रमुख उपस्थिती💥 


फुलचंद भगत

वाशिम: नॅझरीन नर्सेस ट्रेनिंग कॉलेज रेनॉल्ड्स मेमोरिअल हॉस्पिटल वाशिम येथे दि. १६ जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी एच.एस.मुंडे,रक्त संक्रमण अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम,एस बी डाखोरे,रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय, एस के दंडे , वैद्यकीय समाजसेवक जि . सा.रु.,ए इंगळे अधिपरिचारिका . जि . सा . रु.,एल यु काळे , रक्तपेढी परिचर , जि . सा . रु, बाजीराव गवळी प्रशासकीय अधिकारी रेनॉल्ड्स मेमोरिअल हॉस्पिटल वाशिम श्रीमती रजुला असीर , एन एन टी सी प्राध्यापक ; हे उपस्थित होते . या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्य आली . या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित पाहुणे व रक्तदान शिबीर आयोजकांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन नॅझरीन नर्सेस ट्रेनिंग कॉलेज मार्फत सत्कार करण्यात आला .  एच एस मुंडे , रक्त संक्रमण अधिकारी यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच रक्तदानाबद्दल संपूर्ण माहिती दिली . वाशिम जिल्हामध्ये संकलन कमी आहे व रक्ताची मागणी खूप आहे म्हणून समाजातील सर्व नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान शिबीर आयोजन करून अथवा प्रत्यक्ष रक्तकेंद्र मध्ये येऊन रक्तदान करण्याची काळाची गरज आहे तसेच रक्तदान करण्याचे फायदे सुद्धा त्यांनी सांगितले . शासकीय रक्त केंद्रामार्फत दररोज 25 30 रक्त पिशव्यांची पूर्तता वाशिम जिल्ह्यातील व जिल्हयाबाहेरील रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात येते . यामध्ये sickle cell thallasemia major Anemia ग्रस्त गर्भवती महिला या सर्वांना रक्तपुरवठा करण्यात येतो . परंतु रक्तसकलन फार कमी असल्यामुळे ( वार्षिक 2500-3000 ) रक्तकेंद्राला गरजेच्या वेळी रक्तपुरवठा करणे शक्य होत नाही त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक रक्त दात्याने स्वइछेने मानवतेच्या सेवेने प्रेरित होऊन सामाजिक बांधिलकी जोपासून आपली रक्तदाता म्हणून नोंदणी करावी व जास्तीत जास्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णाचे प्राण वाचवावेत असे आवाहन रक्त संक्रमण अधिकारी डॉ हरीदास मुंडे यांनी केले . बाजीराव गवळी प्रशासकीय अधिकारी रेनॉल्ड्स मेमोरिअल हॉस्पिटल , वाशिम यांनी सर्व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना रक्तदाना करिता प्रेरित केले . या कार्यक्रमामध्ये नॅझरीन नर्सेस ट्रेनिंग कॉलेज च्या एकूण 30 विद्यार्थ्यांनी रक्तदाना करिता सहभाग घेऊन मोलाची साथ दिली . रक्तदान शिबिरामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहाने प्रमुख पाहुण्यांकडून शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले.शेकडो विद्यार्थी/विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते...,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या