💥अन भरपावसात रेल्वे खाली जाऊन पर्स काढली....!


💥पॉईंटस मेन सुनील महाजन यांची कौतुकास्पद कामगिरी💥

औरंगाबाद (दि.28 जून 2022) - परभणी येथील शीतल खंडोजी गलांडे या औरंगाबाद येथे वडील पोलीस दलात असल्याने वडिलांना भेटण्यासाठी आई सोबत आलेली होती आज मंगळवार दि.२८ जुन २०२२ रोजी संध्याकाळी औरंगाबाद हुन परभणी जाण्यासाठी मराठवाडा एक्सप्रेस ने जाण्यासाठी आलेल्या होत्या संध्याकाळी ०५-०० वाजे दरम्यान पाऊस पडत होता यातच गाडी येऊन थांबली व पावसाचा जोर वाढला रेल्वे डब्यात चढताना पर्स मोबाइल फोन वडिलांनी फिस भरण्यासाठी दिलेले 17000/- रोख महाविद्यालयची कागद पत्र होती ती काढण्यासाठी ती खाली उतरून जाणार होती. 


तेच कर्तव्य करते वेळी रेल्वे पोलीस संजय राऊत यांनी रोखले याच वेळी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी तिथे पोहोचले त्यावर प्रकार कळताच औरंगाबाद रेल्वे स्टेशन व्यवस्थापक एल के जाखडे यांना माहिती दिली त्यांनी लगेच रेल्वे च्या पॉईंटस मेन सुनील महाजन यांना पाठवले

रेल्वे सुटण्यासाठी फक्त 4 मिनिट बाकी होते तेच उपस्टेशन मास्टर यांना माहिती देऊन सुनील महाजन भर पावसात रेल्वे खाली जाऊन पर्स बाहेर काढून रेल्वे सेना अध्यक्ष कडे देत रेल्वे सेना अध्यक्ष यांनी रेल्वे खालुन सुनील महाजन यांना बाहेर काढले तर रेल्वे पोलीस राऊत यांनी आई व मुलीस रेल्वे पासुन बाजूलाच उभे ठेवलं 

* भर पावसात पर्स परत करण्यात आली :-

यावेळी आई व मुलीने *आनंदात बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्याचं प्रयत्न केला परंतु भाऊ बहिणीस भाचीला देतो मी कसं घेणार असा प्रतिप्रश्न केल्याने त्यांनी आपल्या सारखे भाऊ प्रत्येक बहिणीला मिळो अशी शुभेच्छा दिल्या व रेल्वे नांदेड च्या दिशेने निघुन गेली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या