💥पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामपंचायतीने केलेल्या लाखो रुपयांच्या बोगस विकासकामांची लख्तर पहिल्याच पावसाने टांगली वेशीवर...!


💥बोगस अंडरग्राउंड नाल्यांतील गलिच्छ पाणी अक्षरशः रस्त्यावर : बोगस रस्त्यांच्या कामांचेही पित्तळ पडले उघडे💥


पुर्णा (दि.२३ जुन २०२२) - पुर्णा तालुक्यातील मौ.गौर ग्रामपंचायत प्रशासनाच्या भ्रष्ट व गैरकारभारा विरोधात ग्रामस्थ नागरीकांकडून अनेकवेळा लेखी स्वरूपात तक्रारी दिल्यानंतर देखील पंचायत समिती/जिल्हा परिषद प्रशासनासह जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रारींची कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात येत नसल्यामुळे भ्रष्टाचाराचे जाळे किती मजबूत झाले आहे याचे हे जिवंत उदाहरणच म्हणावे लागेल.


गौर ग्रामपंचायतचे सरपंच श्री/सौ पारवे व ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांनी भ्रष्टाचाराची अक्षरशः हद्दच पार केल्याचे निदर्शनास येत असून गावातील पाणीपुरवठा योजनेच्या विकासावर कागदोपत्री कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून देखील गावातील पाणीपुरवठा योजना अद्याप देखील कार्यान्वित झाली तर नाहीच याशिवाय श्री सोमेश्वर देवस्थानच्या बारवाच्या विकासाच्या नावावर देखील लाखो रुपयांचा निधी कागदोपत्री विकास दाखवून सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी गिळकृत केला आहे.


गौर गावातील सिमेंट रस्ते/अंडरग्राऊंड नाल्यांच्या बांधकामाच्या नावावर देखील लाखो रुपयांचा निधी खर्च केल्याचे दाखवून बोगस कामे केल्यामुळे अवघ्या एक/दोन पावसातच अंडरग्राऊंड नाल्यांसह बोगस सिमेंट रस्त्याचे पित्तळ उघडे पडले असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या भ्रष्ट व निर्लज्ज कारभाराची लख्तर अक्षरशः वेशीवर टांगली गेली आहे.....    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या