💥आत्मा योजना व कृषी विभाग अंतर्गत खरीप पेरणी पूर्व शेतकरी प्रशिक्षणाचे करण्यात आले होते आयोजन💥
गंगाखेड : तालुक्यातील मौजे गुंजेगाव येथे आज मंगळवार दि.०७ जुन २०२२ रोजी आत्मा योजना व कृषी विभाग अंतर्गत खरीप पेरणी पूर्व शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आली होती सदर प्रशिक्षणास मार्गदर्शक श्री डॉ.काकडे सर के.व्ही.के परभणी यांनी खरीप पूर्व नियोजन व बीज प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच कृषी सहाय्यक श्री नागरगोजे यांनी सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रमास शेतकऱ्यास आत्मा योजनेअंतर्गत गट स्थापन करणे व विविध योजना बाबत माहिती देण्यात आली श्री सोनटक्के व श्री सिरस सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गंगाखेड श्री.कालीदास पौळ कृषीमित्र यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले.
0 टिप्पण्या