💥जगामध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याचे सामर्थ्य बुद्ध विचारांमध्ये आहे......!


💥प्राचार्य डॉ .उमाकांत होनराव यांचे प्रतिपादन💥

बुद्ध विहार पूर्णा याठिकाणी दिनांक 14 या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमे निमित्त भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जाहीर धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन यात आले होते.


विचार मंचावर भंते पय्यातीस थे रो , भंते पैयावंश, भन्ते संघरत्न यांची उपस्थिती होती प्रमुख वक्ते व सत्कारमूर्ती म्हणून  लातूर येथील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व प्राचार्य डॉक्टर उमाकांत होनराव, प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे, सामाजिक युवा कार्यकर्ते खटके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त केशव कांबळे, नांदेड येथील सेवानिवृत्त अभियंता यशवंत गच्‍चे परळी येथील प्रकाश तू श्याम आदींची उपस्थित होती.

प्रमुख मार्गदर्शन यामध्ये उपस्थितांना संबोधित करताना प्राचार्य डॉक्टर उमाकांत होनराव यांनी भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान  विचार  या वर यथोचित प्रकाश टाकताना सांगितले जगामध्ये शांतता सुव्यवस्था स्थापित करण्यासाठी व क्रो धा वर नियंत्रण करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे.या माध्यमातूनच जगामध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण होऊ शकते.

प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून आंतरराष्ट्रीय संदर्भ देऊन भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानव ता वादी विचारावर भाष्य करताना ते म्हणाले तथागत भगवान बुद्धांनी माणसाने माणसाशी कसे वागावे कसा संवाद साधावा . दुःखी माणसाला दुःख मुक्त करण्याचे काम भगवान बुद्धांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुप्रसिद्ध चित्रकार होते. त्यांनी डोळे उघडे असलेल्या भगवान बुद्धांचे चित्र रेखाटून त्यांना चालते बोलते बुद्ध अभिप्रेत होते.

युवा सामाजिक कार्यकर्ते  सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे लातूर येथील मुख्य संयोजक विनोद खटके यांनी पंचशिलेच महत्व विशद करताना तरुणाईने पाचव्या शिलाच पालन व्यसनापासून दूर राहावं असा मोलाचं सल्ला त्यांनी दिला.भदंत डॉ.उप गुप्त महाथेरो यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.आपल्या प्रमुख धम्म देश ने मध्ये जेष्ठ पौर्णिमेचे महत्व विशद केले.

यावेळी परभणीयेथील उपासिका माला बाई विलास वेडे  यांच्या कडून उपस्थितांना  भोजन दान देण्यात आले.नांदेड येथील उपासिका अश्विनी दिपक जोंधळे यांच्याकडून खीर दान करण्यात आले. स्मुर्तीशेश एन. टी .ढगे गुरुजी यांच्या परिवाराकडून भिककु संघास चिवरदन करण्यात आले प्रमुख उपस्थितांमध्ये ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे, माजी उपनगराध्यक्ष उत्तम भय्या खंदारे, ज्येष्ठ नगरसेवक अनिल खरगखराटे, नगरसेवक मधुकर गायकवाड, अशोक धबाले पत्रकार विजय बगाटे अमृत मोरे, दिलीप  गायकवाड, अमृत मोरे, शिवाजी थोरात,पंडित डोंगरे, साहेबराव सोनवणे, कामगार नेते अशोक  कांबळे विजय जोंधळे,मुकुंद पाटील मोहन लोखंडे, शाहीर गौतम कांबळे आदींची उपस्थिती होती.सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्धाचार्य त्रंबक कांबळे,अतुल गवळी, किशोर ढ कर गे उमेश बा रहटे सुरज जोंधळे रामू भालेराव प्रकाश जगताप व बुध्द विहार समिती,भारतीय बौद्ध महासभा, व महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या